Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
चोपडा एलआयसी शाखेचे पहिले एमडीआरटी विमा प्रतिनिधी प्रवीण पाटील यांचा आडगाव ग्रामस्थातर्फे नागरी सत्कार..!
चोपडा एलआयसी शाखेचे पहिले एमडीआरटी विमा प्रतिनिधी प्रवीण पाटील यांचा आडगाव ग्रामस्थातर्फे नागरी सत्कार..!
प्रतिनिधी चोपडा चोपडा येथील विमा प्रतिनिधी प्रवीण रमेश पाटील हे चोपडा एलआयसी शाखेत आतापर्यत चे पहिले एमडीआरटी विमा प्रतिनिधी झाल्याबद्दल आज आडगाव येथील ग्रामस्थांनी त्याचा नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
एमडीआरटी विमा प्रतिनिधी अर्थात अमेरिका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रवीण पाटील यांना शहभाग घेता येणार असून ते चोपडा शाखेचे प्रतिनिधित्व करणारे पहिले विमा प्रतिनिधी झाले असल्याचे चोपडा शेतकी संघाचे चेअरमन एल एन पाटील यांनी आपल्या प्रास्तविकात सागितले.
यशोनाम फाऊंडेशन आडगाव तर्फे या सत्काराचे आयोजन चोपडा शेतकी संघाचे चेअरमन एल एन पाटील यांनी केले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच रावसाहेब पाटील होते तर मंचावर आडगाव विकास सोसायटीचे चेअरमन चैत्राम महाजन,जेष्ठ कवी रमेश जे पाटील,ग्रा प सदस्य सुरेश पाटील,सेवा निवृत्त दारू बंदी पोलीस निरीक्षक संतोष पाटील,रवींद्र गोकुळ पाटील,नवल पाटील,विकास सोसायटी संचालक ज्ञानेश्वर पाटील,धानोरा येथील मतिमंद शाळेचे चेअरमन हुकूमचंद पाटील, सेवा निवृत्त मुख्याध्यापक एम व्ही पाटील,भागवत पाटील,निबा पाटील,भोमा पाटील,मधुकर पाटील,भास्कर पाटील,मंगल पाटील,दिलीप पाटील,सुधाकर पाटील,सौरभ कुलकर्णी,याकूब काटिक,शिवाजी पाटील, गुलाब पाटील,
ईश्वर पाटील,भावलाल पाटील,राजेंद्र पाटील,गोपाल पाटील,मुरलीधर पाटील,गजानन पाटील, विकास पाटील,आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावना करताना चोपडा शेतकी संघाचे चेअरमन एल एन पाटील यांनी प्रवीण पाटील यांनी कोरोना काळात फक्त सात महिन्यात चोपडा एलआयसी शाखेत एमडीआरटी कसे मिळवलं याबाबत माहिती दिली.तर यावेळी हुकूमचंद पाटील,एम व्ही पाटील यांनी देखील प्रवीण पाटील यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना प्रवीण पाटील यांनी लोकडाऊन एमडीआरटी होणं ही सोपं गोष्ट नसून विमा व्यवसायात मोठी स्पर्धा असताना केलेल्या कामाचे नियोजनबाबत मार्गदर्शन केले,तसेच मी चोपडा शाखेत पहिला विमा प्रतिनिधी असेन की मला एलआयसी तर्फे अमेरिकेला जाता येणार आहे.आज आडगाव गावात गावच्या सत्काराने मला मोठी ऊर्जा मिळणार असल्याचे सांगून ते गहिवरले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राथमिक शिक्षक गजानन पाटील यांनी तर आभार कवी तथा जेष्ठ पत्रकार रमेश जे पाटील यांनी केले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा