Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

जळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम लोकसहभागातून कुंभारखेडा गावात ऑक्सिजन'सिंले्ण्डर रुमाचे लोकार्पण आ, शिरीष चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन...!



प्रतिनिधी रावेर कुंभारखेड्यात ऑक्सिजन' प्रणीलीचे लोकार्पण कुंभारखेडा उप ग्रामीण रुग्णालयात सुज्ज अशी लोकसहभागातून कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी ,आ्प्तकालिनी स्थितीत ऑक्सिजन'सिलेंडर उपलब्ध करण्यात आले, या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते फित कापून केले,तर प्रमुख अतिथी

अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर, तहसीलदार सौ उषा राणी देवगुणे, गटविकास अधिकारी सानिया नाकोडे,
यांची होती, तसेच उद्घाटनप्रसंगी थोडक्यात अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर यांनी मार्गदर्शन केले तसेच ग्रामीण भागातील अशा शासनाच्या आवाहनाला सकारात्मक भरभरून प्रतिसाद,तो ही तात्काळ त्यांचं त्यांनी मोठ्या दिलाने स्वागत व समस्त कुंभारखेडा गावातील नागरिकांचे, प्रशासकीय अधिकारी, सामजिक कार्यकर्ते, देणगी दार सह संपूर्ण टिमचे अभिनंदन केले,व कुंभार खेडा गावांचा आदर्श जिल्ह्यातील संपूर्ण गावांनी घ्यावा, असे एक भावनिक हाक त्यांनी संपूर्ण समाजाला दिली, 

तसेच मंडळ अधिकारी संदीप जैस्वाल,
अजय महाजन, तलाठी, ग्रामसेवक, श्रीकांत पाटील,पोलीस पाटील, प्रल्हाद पाटील, लोकनियुक्त सरपंच लताबाई बोंडे, उपसरपंच, गोकुळ चव्हाण,  डॉ, विजया झोपे, आरोग्य सेवक बी,डी, पवार,  प्रदिप पाटील, प्रविण बोंडे, सामाजिक कार्यकर्ते विलास ताठे, महेंद्र महाजन, मनोहर पाटील, प्रशांत राणे, समाधान भालेराव, नकुल पाटील, फिरोज तडवी, रविंद्र महाजन,
सतिश पाटील, पिंटू अटावलकर सह आशा वर्कर, आरोग्य सेविका यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,
दि,२३/७/२०२० रोजी मा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून  ग्रामपंचायत स्तरावर आपत्कालीन परिस्थिती करीता ऑक्सिजन' सिलेंडर उपलब्ध असण्याबाबत चा आदेश संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आला होता, 

कारण जळगाव जिल्ह्यातील सद्य स्थितीत मोठ्या प्रमाणात कोवीड-१९ या विषाणूंचा प्रादुर्भावामुळे संसर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, यामुळे चं कोरोना बांधित रुग्णांना श्र्वसनाची खूप मोठी समस्या निर्माण होते, त्यांची शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी होते, या कामी शासकीय यंत्रणा सतत कार्यरत आहेत,पण रूग्णांची संख्या वाढत आहे, यामुळे खेड्यातील कोरोना बांधित रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे, अशी सुविधा जर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध झाली तर कोणी रुग्ण हा शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने मरणार नाही, तसेच तो बांधित कोवीड सेंटर पर्यंत गंभीर परिस्थिती तही पोहोचू शकले, परिणामी त्यांच्या जिवनांचे रक्षणासाठी सुलभ होईल,व शासकीय यंत्रणेला एक प्रकारे मोठी मदत होईल, व कोणत्याही परिस्थितीत कोणी ही रुग्ण तात्काळ मोठ्या दवाखान्यात दाखल करण्यापूर्वी दगावू शकणार नाही, व परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खेड्यात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होणे अत्यावश्यक आवश्यक आहे, 

म्हणून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले होते, 
या शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद जळगाव जिल्ह्यातील कुंभारखेडा वासीयांनी दिला, तसेच कुंभारखेडा गाव हे जळगाव जिल्ह्यातील पहिलं ऑक्सिजन सिलेंडर रुम उपलब्ध युक्त असे उप ग्रामीण रुग्णालया म्हणून नावलौकिक मिळविला आहे, तसेच कुंभारखेडा गावाने जळगाव जिल्ह्यात एक नवा आदर्श निर्माण करून, समाजात सहकार ते सरकार यांचें उत्तम आत्मनिर्भर तेचा पाया रचला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध