Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०
मातृशक्ती संघटनेच्यावतीने श्रींच्या पुण्यतिथीनिमित्त सामूहिक पारायण..!
शेगाव:( शहरं प्रतिनिधी उमेश राजगुरे)श्री संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मातृशक्ती संघटनेच्यावतीने रविवार 23 ऑगस्ट रोजी सामूहिक पारायण चे आयोजन करण्यात आले होते कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत गजानन महाराज यांची 23 ऑगस्ट रोजी 110 वी पुण्यतिथी होती त्या निमित्य निर्मल नगर परिसरातील मातृशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सौ वैशाली ताई तायडे यांच्या निवासस्थानी धार्मिक वातावरणात व शासनाने लागू केलेल्या लोक डाऊन नियमांचे तसेच सोशल डिस्टंसिंग चे पालन करून अत्यंत भक्तिभाव पूर्ण वातावरणामध्ये श्री गजानन विजय ग्रंथ अध्यायाचे सामूहिक पारायण मातृशक्ती संघटनेच्या श्रींच्या भक्त असलेल्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी पार पाडले यावेळी उपस्थित महिलांनी भजन कीर्तन म्हटल्याने संपूर्ण परिसर श्री गजानन मै झालेले दिसत होते यावेळी उपस्थित महिला भाविकांनी व मातृशक्ती संघटनेच्या कोरोना महामारी पासून मुक्तता मिळावी अशी प्रार्थना केली.
शेगाव शहरातील प्रख्यात वकील ॲड. संजय पोकळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सामूहिक पारायण सोहळ्यामध्ये मातृशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सौ वैशालीताई तायडे मातोश्री मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष सौ राजश्री राजकुमार व्यास मातृशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ रुपाली ताई वानखडे राष्ट्रीय सचिव डॉक्टर शबनम शेख राष्ट्रीय कोषाध्यक्ष मुक्ताताई ठाकूर मातृशक्ती संघटनेच्या ज्येष्ठ सदस्य सौ गीताताई वाघ अलकाताई चंद सौ मीनाताई भक्त अरविंद तायडे पत्रकार राजकुमार व्यास प्रथमेश तायडे कुमारी रेणुका तायडे यांच्यासह सह अनेक भाविक महिला सहभागी झाल्या होत्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा