Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १६ ऑगस्ट, २०२०
अखेर पात्र बीएससी पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मंजूर..!
उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.१६ पात्र बी.एस.सी पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मंजूर करून आदेश निर्गमित केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते,उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, तत्कालीन शिक्षणाधिकारी (प्रा.)श्रीम.रोहिणी कुंभार, विद्यमान शिक्षणाधिकारी रामलिंग काळे,कक्ष अधिकारी लांडगे ,जेवळीकर कार्यालयीन विस्तार अधिकारी सुरेश वाघमारे क.सहाय्यक कलमुसे मॅडम या सर्वांची प्रहार संघटने कडून कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.
याबद्दल दि.८जून रोजी प्रहार शिक्षक संघटनेने शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.त्यांच्या मागणीला यश आले आहे तर,तरुणगर्जना न्युजपेपर मध्ये दि.९जून रोजी बी.एस.सी पात्र पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मंजूर करा असे वृत्त प्रकाशित केले होते.
http://www.tarungarjana.com/2020/06/bsc.html
३० सप्टेंबर २०१८च्या ऑनलाईन शिक्षक पद निर्धारणानुसार संदर्भीय पदवीधर शिक्षकांची पदे निर्धारित करण्यात आलेली आहेत.१२ वी विज्ञान ही शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या प्राथमिक शिक्षकांना पाच वर्षात बीएससी पदवी धारण करण्याच्या अटीवर विज्ञान पदवीधर शिक्षक म्हणून पंचायत समिती अंतर्गत रिक्त पदावर पदस्थापना देण्यात आली असून शासन निर्णय ग्राम विकास विभाग दि.०६ मार्च ०१९ अन्वये एस-१४ -३८६००- १२२८०० या वेतनस्तरात बीएससी पदवीधारक शिक्षकांना विज्ञान पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी मंजूर करून आदेश निर्गमित केले.
यात तालुका निहाय पात्र बीएससी पदवीधर शिक्षक
परंडा- ०७
भूम-११
वाशी-०५
कळंब-०९
उस्मानाबाद- १५
तुळजापुर-१६
उमरगा- ०३
लोहारा-०४
असे एकूण ७० पात्र शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीचा लाभ मिळाला आहे.
जिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले:- शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र शासन यांचे परिपत्रक दि.१३ ऑक्टो.१६ च्या शासन निर्णयातील तरतुदी नुसार शिक्षण विभाग प्राथमिक अंतर्गत इ.६वी ते ८ वी या वर्गांना शिकवणा-या शिक्षकांपैकी १/३ शिक्षकांना सेवा ज्येष्ठते प्रमाणे वेतन श्रेणी मंजूर झाल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या कामी प्रहार जिल्हाध्यक्ष
वैजिनाथ सावंत,दत्तात्रय पुरी,दत्तात्रय राठोड,विशाल अंधारे,संतुक कडमपल्ले,रघुनाथ दैन,फिरोज शेख,योगेश चाळक, धनंजय आंधळे,हनुमंत माने, धम्मदिप सवाई,गणेश गोरे, विनोद सुरवसे,शहाजी झगडे, ज्योती देशमुख,सुषमा सांगळे -वनवे, साहेब पवार, अरिफ शेख,भास्कर कांबळे,गोविंद तापडे आदि.पदाधिकारी यांनी पाठपुरावा केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा