Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १६ ऑगस्ट, २०२०
उस्मानाबादचा मुख्य ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न...!
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.16
काल भारताचा 74व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद(धाराशिव) येथे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री ना शंकरराव गडाख-पाटील साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली, त्या सर्वांना पुष्पहार अर्पण करून नमन केले. देश व राज्य मोठ्या एकजूटीने कोरोनाच्या संकटाशी लढत आहे. या लढाईत आघाडीवर असलेले कोरोना योद्धे, स्वच्छता कर्मचारी, स्वस्तधान्ये दुकानदार, पोलिस कर्मचारी, जनजागृती करणारे मीडिया प्रतिनिधी व कोरोनावर मात करून बरे झालेले नागरिक यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त सत्कार केला.
याप्रसंगी जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी सौ.दिपा मुधोळ-मुंडे, जि.प.अध्यक्ष सौ.अस्मिता कांबळे, उपाध्यक्ष धनंजय सावंत,आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पोलिस अधिक्षक राजतीलक रोशन, सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी तसेच पुरस्कार प्राप्त शासकीय कर्मचारी, पोलिस कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, पत्रकार बंधू उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा