Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

खो-खो ची सुवर्णकन्या सारिका काळे यांचा प्रहार शिक्षक संघटने कडून सन्मान...!



उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.23भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार सारिका काळे यांना क्रिडा क्षेत्रात मानाचा समजला जाणारा(अर्जुन पुरस्कार)जाहीर झाला आहे.उस्मानाबाद जिल्ह्याची रहिवासी असलेल्या सारिका काळे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.

शिक्षक,शिक्षण व सामाजिक क्रांतीचे संघटन या प्रहार शिक्षक संघटनेच्या बिरुदावली नुसार समाजाचे भुषण असलेल्या सारिका काळे यांचा तसेच त्यांचे प्रशिक्षक श्री.चंद्रजित जाधव यांचा संघटनेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींसाठी  विविध क्रीडासाहित्य ,योजना व मार्गदर्शन या विषयावर चर्चा करण्यात आली.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत,कार्याध्यक्ष विशाल अंधारे,जिल्हा नेते संतुक कडमपल्ले,उपाध्यक्ष हनुमंत माने,धम्मदीप सवई,तालुकाध्यक्ष विनोद सुरवसे,उपाध्यक्ष शहाजी झगडे आदि उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध