Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोरोना रूग्ण दगावला असता अंत्यसंस्कार कोणी करावा म्हणुन दोन ते तीन तास विलंब , प्रशासनात समन्वयाचा अभाव!
कोरोना रूग्ण दगावला असता अंत्यसंस्कार कोणी करावा म्हणुन दोन ते तीन तास विलंब , प्रशासनात समन्वयाचा अभाव!
जामनेर:प्रतिनिधी: तालुक्यातील टाकरखेडा येथील कोरोना बाधीत मरण पावलेल्या महीला रूग्णावर अंत्यसंस्कार कोणी करावे या गोंधळातच प्रशासनाचा तब्बल दोन ते तीन तासाच्या वर आज खोळंबा पहायला मिळाला.विशेष म्हणजे सदर कोरोना बाधीत ७० वर्षीय महीला रूणाचा मृत्यु सोमवार रात्री बारा वाजेच्या सुमारास झाला होता.
मयत रूग्णाच्या नातेवाईकांनी पालीका व उपजिल्हा रूग्णालयाकडे संपर्क केला असता अंत्यसंस्कार कोणी करावे यावरून टोलवा-टोलवी करीत असल्याचे दिसुन आले, या गंभीर प्रकाराने नातेवाईकांमधे प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली.
येथील बोदवड रस्त्यावरील कोवीड सेंटरमधे पाच दिवसांपुर्वी सदर महीलेला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
दरम्यानच्या काळात बोदवड रस्त्यावरील या कोवीड सेंटर मधील दाखल रूग्णांनी मिळणाऱ्या अपुर्ण सोयी-सुवीधांबाबत सकाळपासुन तर दुपार पर्यंत चांगलाच गोंधळ केला.येथील वैद्यकीय सुवीधा,चहा,नास्ता,जेवणाबाबतही रूग्णांकडुन तक्रारी ऐकायला मिळाल्या.
मात्र इकडे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार कोरोना रूग्णांना आवश्यक वैद्यकीय उपचार आणी सर्व सोयी-सुवीधा चांगल्या दिल्या जात आहेत,यात कुठलाही भेदभाव करण्यात येत नाही.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा