Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

शिरपूर भाजपा तर्फे घंटानाद आंदोलन मंदीर,मस्‍जीद,चर्च,गुरूद्वारा,बुध्‍दविहार,जैन मंदीर सुरू करावे राज्य सरकार कुंभकरणा पेक्षाही गाढ झोपेत...!भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी...!



शिरपूर : राज्‍य शासनाने सर्वधर्मीयांची देवालये अर्थात मंदीर, मस्‍जीद, चर्च, गुरूद्वारा, बुध्‍दविहार, जैन मंदीर आदी प्रार्थनास्‍थळे त्‍वरीत उघडावी यासाठी शिरपूर भाजपा तर्फे दिनांक 29 ऑगस्‍ट रोजी सकाळी 11.00 वा. भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा नेतृत्वाखाली ‘घंटानाद’ आंदोलन करण्‍यात आले. यावेळी ‘दार उघड उध्‍दवा, दार उघड’ अशी हाक या आंदोलनाच्‍या माध्‍यमातुन मुख्‍यमंत्र्यांना देण्‍यात आली. गेले सहा महिने संपूर्ण जग, देश, महाराष्‍ट्र कोविड-19 च्‍या महामारीचा सामना करीत आहे. लॉकडाऊन नंतर राज्‍यात टप्‍प्‍या टप्‍प्‍याने अनलॉक करण्‍यास जेव्‍हा सुरूवात केली तेव्‍हा राज्‍यातील जनतेने राज्‍य शासनाने केलेल्‍या आवाहनाला सकारात्‍मक प्रतिसाद दिला आहे. 

राज्‍य शासनाने व्‍यसनाधीन असणा-या नागरिकांची सोय व्‍हावी यादृष्‍टीने दारु दुकाने सुरू केली. मात्र दुसरीकडे आपले आराध्‍य, श्रध्‍दस्‍थानांसमोर भक्‍तीने लीन होण्‍यासाठी मंदीर, मस्‍जीद, चर्च, गुरूद्वारा, बुध्‍दविहार, जैन मंदीर आदी प्रार्थनास्‍थळे मात्र नागरिकांसाठी सुरू केली नाहीत ती सुरु करावीत तसेच संतांची भूमी असलेल्‍या महाराष्‍ट्रात मॉल्‍स, मास, दारु दुकाने चालू झाले मात्र सर्वधर्मीयांची देवलाये बंद आहेत. 

राज्य सरकार कुंभकरणा पेक्षाही गाढ झोपेत असलेल्‍या ठाकरे सरकार जागे व्हा जागे व्हा असे आवाहान भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी केले. शिरपूर शहरातील यशवंत शाळा जवळील श्रीराम मंदीराचा बाहेर  घंटानाद आंदोलन करण्यात आले. 

इतर राज्‍यांमध्‍ये देवालये, प्रार्थनास्‍थळे सुरू करण्‍यात आली आहेत. मात्र हा निणर्य महाराष्‍ट्रात अंमलात आला नाही. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सावधानी बाळगण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक फलक मंदीर,मस्‍जीद,चर्च,गुरूद्वारा, बुध्‍दविहार,जैन मंदीर आदी प्रार्थनास्‍थळांसमोर लावण्‍यात यावे व सोशल डिस्‍टन्‍सींग पाळत ती सुरू करण्‍यात यावीत अशी मागणी भाजपातर्फे करण्‍यात आली. याप्रसंगी आंदोलनात शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, मा. जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, मा. जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, नगर सेवक देवेंद्र (भुरा ) राजपूत, पिपल्स बॅन्क संचालक संजय चौधरी, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, शामकांत ईशी, नितीन राजपुत, विक्की चौधरी, मुबीन शेख, प्रशांत चौधरी, सुनिल चौधरी, बापु लोहार, अविनाश शिंपी, भालेराव माळी, नरेंद्र पाटील, महंत सतीश भोंगे महाराज, प्रमोद भोंगे, सुरेश शिंपी, अशोक सोनार, मनोज बारी आदी  उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध