Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

एम.पी.एस.सी वाली जनता एक छुपी बेरोजगारी....!! !



कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे.सर्व शाळा कॉलेज,क्लासेस,अभ्यासिका बंद आहेत, सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत याला राज्यसेवा परीक्षा देखील अपवाद नाही,याचं पार्श्वभूमीवर लिहिलेला वास्तववादी सडे-तोड लेख...

साधारणत:अस् ठरवून MPSC करायला आलेले कमी अन् आमच्या सारखे Ded झालं CET होणार नाही मग दुसर काय करणार म्हणून अथवा Engg झालय् 10 -12 हजार पगारावर कुठ Job करणार अशा अनेकविध कारणांनी विचीरांनी मजबुरीने MPSC तयारीला लागलेलेच जास्त दिसतात... तसे काही अपवाद ही असतील.. मग ही जनता MPSC ची राजधानी सदाशिव पेठेत प्रवेश घेते अन् इथं आल्यावर मोठमोठ्या क्लासवन अधिकाऱ्यांची “गेस्ट लेक्चर” ऐकायला मिळायला लागतात.  एकताना इकडं सगळं प्रंचड सोपं असतय अशा आविर्भावतली त्यांची भाषणं ऐकुन अन् साहेब, फौजदार अशा हाकांमुळे  या  MPSC वाल्या जनतेच्या  डोक्यात “प्रशासकीय अधिकारी” नावाचा किडा कधी Entry करतो कळातच नाही. 

गावाकडच्या  जनतेने घरची दु:ख, गावाकडचे  प्रश्न, समस्या  जवळुन बघितल्याच नसतात तर प्रत्यक्ष अनुभवल्याही असतात... मग समाजसेवेचे झटके येण चालू होतात.. समोरचं चित्र मनापासून बदलावं वाटात.. प्रशासकीय सेवेतील पदाची ताकत माहीती झाली असते त्यामुळं प्रशासनात आपन स्वतः जाऊन आपले अन् समाजाचे प्रश्न सोडवायचे या विचाराच्या किड्याने आता डोक्यात पक्के घर केलेले असते. 

सुरूवातीली जी ती Senier जनता , lecturer यशवंतांच्या अनेक कहाण्या सांगतात अन शेवट  यशस्वी होयच असल तर तुमच्याकडं जिद्द, चिकाटी अन् मेहनत  या गोष्टी असाव्याच लागतील या वाक्यानंच शेवट करतात.. आणि  मग या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सुरू होतो खरा स्वप्नांचा पाठलाग ....! 
'आम्ही 100% अधिकारीच बनवतो, इथ प्रवेश म्हणजेच यश' अशा  जाहिराती पाहुन ज्यांना 100% पतपुरवठा होण्याची खात्री असते असे क्लासमध्ये प्रवेश घेतात पण क्लास पुर्ण करणारे क्वचितच मिळतील..

MPSC न आता एवढा ताबा मिळवलेला असतोय की सुट्टीला गावाकड जरी गेली तरी शेतात पाणी देत असतानाही या  जनतेला लालदिवा अन् वर्दीचीच स्वप्नं पडु लागतात....!!

सकाळी  7 वाजले की लवकर आवरण्याची धावपळ सुरु होते कारण  लवकर जावून अभ्यासिकेत जागा पकडायची असतीय...तस्स जागेवर बरचस् अवलंबून असतय् i. e. fan, वातावरण, Ventilation अन् बरचसं... एकदा का जागा मिळाली की अभ्यासाचा श्रीगणेशा करून अर्धा एक तास झाल की जनता निघालीच 7 च्या सांबर सेव वाल्या दादाच्या पोह्याकड अथवा भगवंत नाश्ता सेन्टर वर (इथले तर अनेक किस्से आहेत) .. तस्स रोजच ठरलेले पोहेच असतात, आवडतात म्हणून नाही तर quantity जास्त येते म्हणून...अन् त्यानंतर रेवती चा कंटीग घेवून पुन्हा अभ्यासिकेत..

काही काही रात्री जागणारे Night अभ्यासिका लावून अभ्यास करतात..कारण अभ्यास तर करावाच लागतो, दूसरा पर्यायच नसतो ना..रोजच तोच अभ्यास...मग कधी या जनतेला डोक्यावर परिणाम झाल्यासारखंही वाटायल लागतं. Polity च कार्यकारी मंडळ वाचताना आपणही  प्रतिष्ठित अधिकारी झाल्याचे भास होऊ लागतात . देशाचा GDP समजुन घेताना आपल्या मायबापाच्या कष्टाचे सकल वार्षिक उत्पन्नाचा आपल्यावर होणार्‍या खर्चाचा अन्  यशाचा संबंध आपसुकपणे संबंध जोडला जातो. इतिहास वाचताना स्वतंत्र्यासाठी घेतलेल्या कष्टाचा संबध आपल्या शिक्षणासाठी घरच्यांनी लहानपणापासुन घेतलेल्या कष्टाचा इतिहास आठवून यशासाठी मन 1857 च्या उठावा सारख बंड करून उठत.

 भूगोलाच्या अभ्यासात पर्जन्य चा अभ्यास करताना गावाकडच्या बेभरवशी पावसावर विश्वास ठेवून राब राब राहणारे मायबाप आठवल्याशिवाय राहत नाहीत... “टी ब्रेक” मध्ये चहाच्या घोटांबरोबर चालु घडामोडी वर रंगणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र,  मराठवाडा, GDP,  पवार, मोदी, गांधी ते सरकारी धोरणांवर  डिस्कशन होतंच पण एकांतात असलं की स्वतः च्या धोरणांवर ही नजर जातेच...रविवार असो वा शनिवार सगळेच वार सारखे.. Same युद्धासारखच चाललेल असतय अविरतपणे.. ध्येय एकच जिंकनं... 

एकंदर असंच काही  सुरु असताना  मग प्री ऍड येते.. सगळी जनता  खडबडून जागी होते. फॉर्म भरले जातात...पुन्हा मर मर अभ्यास केला जातो... प्री, मेन्स,  इंटरव्ह्युवही दिला जातो ..एवढ करुनही कुठेतरी कमी पडल्याने रिझल्ट मध्ये अपेक्षित असताना देखील यश मिळत नाही .. अभ्यास कमी पडला असेल अस् समजुन परत पुढच्या वर्षीच्या तयारी, परत पुढच्या वर्षीची अस करत करत अशीच पंचवार्षिक योजना पुर्ण झाली तरी हातात कायच येत नाही....!! 

आणि शेवटी काय.. 
तोपर्यंत वय वाढलेले असते... घरूचेही पैसे देवून देवून थकतात.. मग खिशात पैसे उरत नाहीत... लग्नही जमत नाही... नोकरीही नसते.. व्यवसाय करावे तर भांडवल सगळ अभ्यास करताना सदाशिव पेठेतच संपलेल असतय.. So भांडवल ही नसतय... घरच्यांना काय उत्तर द्यायचे कळत नाही...

पाहुणेमंडळी काय विचार करतीलअन गावात लोक काय म्हणतील हे विषय तर विचार करण्या पलीकडचे बनलेले असतात...एवढं अपयश हातात घेऊन ही आमची MPSCवाली जनता अथवा भावी अधिकारी जेव्हा गावाकडे येतात तेव्हा त्यांच्यात किती नैराश्य आलेले असतय...याचा विचारही नाही करू शकत..!! मग काही प्रश्न उपस्थित होतात....
या MPSC वाल्या जनतेच्या नुकसानीला जबाबदार कोण...?त्याची कारणे कुठली...?
जागा वाढत नसतानाही स्पर्धकांची संख्या मात्र वाढत आहे यावर उपाय आहेत काय..?? 
याच जनतेच्या पैशांवर क्लासेस, पुस्तक लेखक- विक्रेते, झेरॉक्सवाले, हॉस्टेल, लायब्ररी, हॉटेल, चहावाले, मेसवाले, रद्दीवाले एवढंच कशाला आयोग सुद्धा श्रीमंत होत आहेत.. पण या जनतेच काय... ? 

बेरोजगारीचा अभ्यास करताना या बेरोजगारीच्या विस्फोटाची जाणीव आहे काय...? 
म्हणून  MPSC ची तयारी करणाऱ्या छुप्या बेरोजगारीला द्रश्य स्वरूपात आणन खूप गरजेच आहे...तेंव्हाच कुठतर त्यावर उपाययोजना करयला सुरूवात होईल...!! 

लेखक:- श्री.मल्हारी हनुमंत भिलारे (लिपिक एन.डी खडकवासला,पुणे) 

संकलन:- श्री.राहूल शिंदे, विभागीय संपादक दैनिक तरुण गर्जना(9975114800)



६ टिप्पण्या:

  1. Mpsc च अभ्यास करून पद जरी नाही मिळाले तरी त्या विद्यार्थ्यांना जे ज्ञान प्राप्त होते ते त्यांना इतर व्यावसाईक कामात, बराच फायदा होतो, ज्ञान कधीही वाया नक्कीच जात नाही,
    कुठे तरी एखाद्या पुढार्यांच्या मागे कार्यकत्रे म्हणून फिरणे, चुकीचे काम करणे ह्या पेक्षा त्या शेतकऱ्यांच्या मुलाने अभ्यास करणे कधी पण चांगले , मुले अभ्यास करत आहे ते काई गैर नाही, अभ्यास करून कोणी झीझत नाही,
    MPSC IS NOT ONLY A JOB IT IS OPPORTUNITY TO SERVE NATION,
    ,ही भावना अधिक महत्वाची,
    वरील लेख मी पूर्ण वाचला मला ह्यात negatively feedback जाणवला,
    मी एक शिक्षक आहे मी विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन करत असतो करत राहील,

    उत्तर द्याहटवा
  2. 2 वर्ष पूर्ण अभ्यासाला द्या आणि त्या नंतर नोकरी करत परीक्षा द्या....म्हणजे बेरोजगारी च तणाव जाणवणार नाही..घरच्यांचा भार हलका होईल....कारण 2 वर्षात आपला पाया भक्कम झालेला असतो...त्यानंतर फक्त उजळणी करून परीक्षेला जाणे एवढच राहिलेलं असत..आणि ते नोकरी करत सहज शक्य आहे...धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  3. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशामध्ये सर्वच सर्वच क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार माजलेला आहे त्याला सीबीआय कोर्ट हे क्षेत्र सुद्धा अपवाद नाही आणि त्याच प्रमाणे एमपीएससी मध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे परंतु ज्या मुला मध्ये एमपीएससी चा किडा घुसलेला असतो त्यांना एमपीएससी मध्ये भ्रष्टाचार आहे हे त्यांचं मन मान्यच करत नाही आणि त्यांना वाटतं जरी असेल भ्रष्टाचार दहा वीस टक्के तरीसुद्धा मी यामध्ये अभ्यास करून 100% अभ्यासाच्या ऐवजी अभ्यास करून एक्स्ट्रा अभ्यास करून ही पोस्ट मिळवले णि एमपीएससी मध्ये बघायला गेलं तर त्याच्या खूप सार्‍या त्रुटी आहेत परंतु एमपीएससी सुद्धा त्या त्रुटी मान्य करायला तयार नाही आणि क्लासेस वाले सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये खोट आत्मविश्वास ठासून ठासून भरण्याचे काम करतात जिद्द चिकाटी सातत्य ह्या गोष्टी जर ठेवला तर तुम्ही नक्कीच यशस्वी होणार परंतु हे क्लासेस वाले विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी सांगायला विसरतात की एमपीएससीमध्ये दरवर्षी किती पदे भरली जाईल हे एमपीएससी'ला सुद्धा माहित नसतं आणि शासन सुद्धा सध्याला कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यास उत्सुक आहे त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीचे स्वप्न बघणं कमी करावं आणि आज भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झालेला आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. तुम्ही तुमच्या आयुष्यातील दोन ते तीन वर्ष पूर्ण वेळ अभ्यास करून एमपीएससी यूपीएससी परीक्षा पास होण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा.आणि या दोन तीन वर्षाच्या अभ्यासामध्ये तुम्ही जर प्रत्येक वेळेस एमपीएससी'ची पूर्वपरीक्षा पास होत असाल किंवा पूर्व परीक्षा 12 मार्गाने तुमचं जर चुकत असेल तर तुम्ही कंटीन्युज पुढे अभ्यास करून ट्राय द्यायला हरकत नाही. आणि दोन-तीन वर्षांमध्ये जर तुम्ही एमपीएससीच्या पूर्व परीक्षेच्या किंवा यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेच्या कट ऑफ च्या जवळ सुद्धा जर पोहोचत नसाल तर तुम्ही हे क्षेत्र सोडलेलं बरं आणि आज प्रत्येकाला माहीत आहे भारतामध्ये भ्रष्टाचार हा खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये माजलेला आहे भ्रष्टाचाराची कीड न्यायालय सरकारी भरती भरती यंत्रणा एमपीएससी यूपीएससी या सर्व क्षेत्रांमध्ये बसलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर महाभरती च्या नावाखाली तरुण लोकांना गाजर दाखविण्यात आली 36000 पदाची भरती भरण्यात येईल आणि त्याद्वारे लाखो लोकांनी द्वारे आपले पैसे कष्टाचे पैसे शासनाच्या घशामध्ये कोंबले आणि शासनाने या पैशावर ती केली आराम आराम केला मजा उडवली परंतु कोणतेही सरकार आले तरी मला तरी वाटतं की 100% पारदर्शक नोकर भरती होत नाही . एमपीएससी यूपीएससी करतोयस सुरुवातीला सांगायला खूप चांगलं वाटतं मित्रांनो परंतु जेव्हा हातात न महत्त्वाची उमेदीच्या काळात ती चार पाच वर्षे निघून गेलेली असतात तेव्हा खूप सरफेस टेन्शन तुम्हाला येऊ शकतो त्यामुळे तुम्हीच वेळीच निर्णय घ्यायला हवा की मी माझ्या आयुष्यात मध्ये खरंच एमपीएससी करायला हवी की नाही किंवा एमपीएससी मध्ये कधी चारशे पदं निघतात कधी 70 जागा निघतात त्यामध्ये आरक्षण असते मित्रांनो यामध्ये सर्व या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लोक जे लोक शासनाच्या सेवेमध्ये आहेत एमपीएससी पास झालेले आहेत ते सुद्धा आपला एका तात्या 70 जागा मध्ये आरक्षण सुद्धा असतं मग तुमच्या सारख्या नवीन विद्यार्थ्यांच्या वाट्याला जागा येणार तरी किती मी असं म्हणत नाही की तुम्ही अभ्यास करू नका किंवा एमपीसी करू नका परंतु एक मर्यादित वेळ ठरवा त्यावेळी तुम्हाला सिद्ध झालं नाही तर तुम्ही काहीतरी दुसरा आपल्या तयार ठेवा.

    उत्तर द्याहटवा
  5. *पर्याय नेहमीच शोधून ठेवा मित्रांनो तुम्ही व्यवसाय करू शकता किंवा प्रायव्हेट कंपनी मध्ये मल्टिनॅशनल कंपनी मध्ये जॉब करू शकतात कारण तुम्ही एमपीएससीच्या पूर्व परीक्षेची तयारी केल्यामुळे तुम्हाला mnc या कंपन्यांमध्ये जॉब मिळवणं अवघड नाही.

    उत्तर द्याहटवा

प्रसिद्ध