Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

दि.02/सप्टेंबर/2020, ला.सौ.कविता सतीश अंभोरे ह्या गरीब कुटुंबाची सोनटक्के मॅडम यांनी घेतली दखल...!



केळापूर तहसील च्या अन्नपुरोवठाअधिकारी सोनटक्के, मॅडम यांच्या निदर्शनात श्री कविता सतीश अंभोरे ह्या परिवाराचं कुंपण अनेक महिन्यापासून बंद असल्याने त्या परिवाराला अन्नधान्याचा लाभ मिळत नव्हता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ह्या शिधापत्रिका साठी अपात्र ठरत होते त्या नंतर सतिश अंभोरे यांनी भोई समाज युवा मंचचे जिल्हाध्यक्ष प्रदीप नागोराव भनारकर, यांना भेटून ही समस्या सागितली की अनेक महिने झाल्याने राशन कार्ड वर धान्य मिळत नाही 

आहेत कोरोना काळात अनेक संकट आली परंतु असे किती दिवस चालणार व भनारकर, यांनी ही समस्या अन्नपुरवठा अधिकारी सोनटक्के, मॅडम यांना भेटून यांच्या निदर्शनात आणून दिल्यास मॅडम यांनी अवघ्या दोन दिवसात ती समस्या सोडवली. 

सोनटक्के मॅडम, व तसेच केळापूर चे अन्नपुरवठा दुकानदार विनितजी मुत्था, शंकर राऊत, तसेच केळापूर तहसील चे कर्मचारी सुनीलजी भिमरतीवार, यांनी पूर्ण सहकार्य केल्या बद्दल  त्यांचे प्रदीप भानरकर  व कविता अंभोरे यांनी आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध