Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ६ सप्टेंबर, २०२०
शेगावचे डॅशिंग व धाडशी व्यक्तिमत्त्व पत्रकार अमर बोरसे यांची कोरोनावर मात...!
शेगांव (प्रतिनिधी उमेश राजगुरे)जिल्हयात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत असून त्याच प्रमाणे रुग्ण बरे होवून घरी जाण्याचे प्रमाणही जास्त असल्यामुळे काही अंशी का होईना नागरिकांना दिलासा मिळत आहे.
पण सतत जनतेच्या कामासाठी झटणारे शेगांव तालुक्यातील डॅशिंग पत्रकार अमरभाऊ बोरसे यांनीही कोरोनाची लागण झाली होती पण उपचार घेतल्या नंतर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यांचे घरी आगमन झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले असून कोरोनाचा धोका हा बालकांना आणि वृद्धांना जास्त असल्याचं म्हटलं जातंय. पण आमचे युवा पत्रकार देखील यामध्ये भरडल्या गेले खरी पण त्यांच्यासाठी रात्र दिवस प्रार्थना करणारे हात एवढी होते की काही दिवसांत त्यांना ईश्वराणे ठणठणीत केले उपचार झाल्यावर दिनांक ०३ सप्टेंबर ला दिलासा देणारी बातमी म्हणजे डॅशिंग पत्रकार अमर बोरसे यांनी कोरोनावर मात करून ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
त्यांच्यावर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगांव द्वारे व्यंकटेश नगरात पुष्पवृष्टी करण्यात आली असून सोमवार पासून ते पुन्हा आपल्या कर्तव्यावर सुरू होणार आहेत.
पत्रकार अमर बोरसे यांची समाजसेवक म्हणून ओळख
शहरात पत्रकारिता करत असताना गोरगरीब अन्यायग्रस्त लोकांना वृत्तपत्राच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम अमर बोरसे हे नेहमीच करतात तर त्यापलीकडेही रात्री-बेरात्री दवाखान्यात सह इतरही मदतीसाठी त्यांना फोन केला असता तात्काळ हजर होऊन मदत करतात त्यामुळे शेगाव तालुक्यात समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा