Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवावी,कृषी पदवीधर संघटनेची तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी...!
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवावी,कृषी पदवीधर संघटनेची तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी...!
२१ सप्टेंबर २०२०(शिरपूर) नुकत्याच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कांदा निर्यातबंदी चा निर्णय झाला.शेतकरी अनेक संकटे झेलून शेती करतो, दर दोन वर्षांनी असणारा अवकाळी पाऊस व लॉकडाऊन नंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाले.यात भर म्हणून सरकार ने कांदा निर्यात बंदी जाहीर केली .
या निर्णयामुळे कांद्याचे भाव साहजिकच ढासळणार आणि शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात येणार. महोदय शेतकरी पिकवतो म्हणून लॉकडाऊन मध्ये सुद्धा ग्रामीण व कृषी अर्थ व्यवस्था तग धरून आहे.याच कारणाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन लवकरात लवकर कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी निवेदनाद्वारे शिरपूर तहसीलदार मा.श्री आबा महाजन यांना करण्यात आली व कांदा निर्यात बंदीचा कृषी पदवीधर संघटना शिरपूर तालुका यांच्याकडून जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी कृषी पदवीधर संघटनेचे धनंजय चौधरी (धुळे जिल्हा अध्यक्ष ,उद्योग आघाडी), प्रेम चौधरी (शिरपूर तालुका उपाध्यक्ष,युवक आघाडी),आशिष सिसोदिया (तालुका अध्यक्ष,विद्यार्थी आघाडी)व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा