Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०
अहमदनगरमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार,पोलीस निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल...!
अहमदनगर:प्रतिनिधी: 29 सप्टेंबर नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक आणि सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला वादग्रस्त पोलीस अधिकारी विकास वाघ याच्याविरोधात अखेर तरुणीचा छळ करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विकास वाघ सध्या सुट्टीवर आहे.
2019 मध्ये तक्रार देण्याच्या निमित्ताने कोतवाली पोलीस ठाण्यात आलेल्या 26 वर्षीय तरुणीशी विकास वाघ याने ओळख वाढवली. काही दिवसानंतर वाघ हा पीडित तरुणीच्या घरी गेला. ही माझी मुलगी आहे असे सांगत जवळीक वाढवली आणि नंतर घरी जाऊन तिथे तिच्या असाह्यतेचा फायदा घेऊन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वाघ याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.
याबाबत पीडित तरूणीने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वाघ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीने प्रतिकार केला तेव्हा वाघ याने तिला कंबरपट्ट्याने जबर मारहाण केली. तसेच 'ही बाब कुणाला सांगितली तर तुझे कुटुंब संपवून टाकील' अशी धमकी दिली. त्यानंतर विकास वाघ याने पीडितेवर वेळोवेळी कधी हॉटेल तर कधी कोतवाली पोलीस निरीक्षकाच्या निवासस्थानी अत्याचार केला. पीडित तरुणी गरोदर राहिल्याची बाब वाघ याला समजल्यानंतर त्याने 26 सप्टेंबर 2019 रोजी तिला तो राहत असलेल्या बंगल्यावर नेऊन मारहाण करत जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि गर्भपात केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.
या त्रासाला कंटाळून पीडितेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. ही बाब विकास वाघ याला समजल्यानंतर त्याने पीडितेला एमआयडीसी परिसरात नेऊन धमकी दिली. तसंच तिच्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत.
त्यानंतर 11 सप्टेंबर 2020 रोजी वाघ याने पीडितेला जबरदस्तीने नगर तालुक्यातील मिरावली पाडावर नेऊन तेथेही तिच्यावर अत्याचार करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून विकास वाघ याच्याविरोधात बलात्कार, मारहाण, जबरदस्तीने गर्भपात आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बेटावद / शिरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इ...
-
शेळगावातील तरुणांचा दारूबंदीचा निर्धार; ग्रामस्थांच्या वतीने माजी सैनिकासह दोघांचे आमरण उपोषण परंडा, दि. १२ : शेळगाव ग्रामसभेने ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा