Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

शेतकरी असाच सरकारी व्यवस्थेचा बळी पडत रहात असेल तर, कशी जगेल शेती आणि शेतकरी राजा...?


लहान पासून आपल्याकड असणारी एक म्हण ऐकत आलोय.. 
उत्तम शेती , 
मध्यम व्यापार ,  
आणि कनिष्ठ नोकरी.

पण शेतकर्‍यांकड केल्या जाणार्‍या सर्वच स्तरातुन दुर्लक्षामुळे वरील म्हणी तील परिस्थिती तर आनखीनही  म्हणण्यापुरतीच मर्यादित आहे.. आजवर  शेतकर्यांना शेती उत्तम वाटावी असा कुठला प्रयत्न केला गेलाय अस  दिसुन येत नाही. पण बहुतांश राजकारणी किंवा त्यांची हुजरेगिरी करणारे अधिकारी हे मात्र सातबऱ्यावरचे शेतकरी मात्र नक्कीच दिसून येतील. 

 आतपर्यंत फक्त निवडणूका जाहीरनामे वैगेरेत  '' जय किसान'' असा नारा देयचा अन् वरवरचा आव आणायचा येवढच होत आलेल आहे. कुठल एक सरकार, नेता किंवा पक्ष शेतकऱ्यांना फायदेशीर निर्णय घेतील त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतील असं समजणं म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा आहे..असच् वाटत राहत..! 

हा पुन्हा एखादा विषय मांडण्याच कारण म्हणजे आमच्या पंरडा तालुक्यातील नळी नदीवरील पाठीमागील 4 वर्षापासुन कोरडा असलेला खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्प  परतीच्या पावसाने पूर्ण क्षमतेने (10.800 द.ल.घ.मी) भरून  वाहत होता...माघील 3 वर्षापासून या भागातील दुष्काळाला तोंड देत आलेला बळीराजा मनोमन सुखावला होता.पण परवा परिसरातील नागरीक सुखावलेले डोळे घेवून भरलेला तलाव पाहण्यासाठी  गेले असता या प्रकल्पाच्या भरावास वरील बाजूला भूकंप होवून पडावी अशी भली मोठी लांब भेग पडल्याची दिसून आली हे कोणत्याच प्रशासकीय यंत्रणेने पाहीले नव्हते, तलावावर लक्ष ठेवण्यासाठी नेमणुक केलेली व्यक्ती काय करत होती?  संबंधित अधिकारी कोठे होते? शेतकऱ्यांनीच पुढे येऊन प्रसंगअवधान राखून माहिती दिली. अन् शेतकर्‍याच्या आनंदात विरजन पडावे तसे या पूर्ण क्षमतेने भरलेला तलावातील पाणी सांडवा फोडून व कॅनॉलद्वारे खाली करावे लागले. क्षणार्धात होत्याच नव्हत  झाल. बळीराजाने पाहिलेले स्वप्न अखेर स्वप्नच राहील....
 
यानंतर मात्र या भागातील शेतकऱ्यात व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने, तातडीनं नदी काठच्या लोकांना अतिदक्षतेचा इशारा देऊन त्यांचे तात्पुरते स्थलांतर वगैरे केल गेल. पण हे सर्व काही घडून गेल्यानंतरच झालेल वाचण्यात येतय,  समजतय,  आमुक तमुक पंचायत समिती पदाधिकारी, जिल्हा परिषद पदाधिकारी, आमदार, खासदार आणि तथा कथित युवा नेतृत्व, स्वंयघोषीत नेते अथवा तहसिलदार, जिल्हाधिकारी,  जलसंपदा विभाग यांनी आमुक तमुक फलाना बिस्ताना  केले. अरे हो पण सगळ घडून गेल्यानंतरच ना.... 

म्हणून अनेक प्रश्न निर्माण होतात. 
-प्रकल्पाचे काम झाले त्यावेळी प्रमाणिकपणे Inspection केल गेल होत का..?
पावसाळ्यापुर्वी जलसंपदा विभागा कडून पाहणी करण्यात आली होती का..? 
तलावाची वेळोवेळी स्वच्छता केली जाते त्यावेळी ही गोष्ट लक्षात कसकाय आली नाही..?
अथवा नेहमी प्रमाणेच यावेळीही कागदोपत्रीच स्वच्छता, पाहणी अन् All OK रिपोर्ट बनवला गेला होता काय...? 
धरण परिसरात 10 -10 परूस विहीर खोदताना अमर्याद Blasting ला Permission देताना या गोष्टी संबधित विभागाने का विचार केला नसेल...? 
वरील उल्लेख केलेल्या आदरणीय मोहदोयांच्या शब्दाला असलेला मान मागच्या 2 दिवसापासून ही गोष्ट घडून गेल्यानंतर दिसून येतोय तो पूर्वी नव्हता का...? 

- बाकी बऱ्याच गोष्टी साठी अधिकार्यांना आपली Power, दबाव वगैरे दाखवणारे संबधित विभागाला त्यांच्या नियमित कामा बाबत तीच power वैगरे का वापरताना दिसून येत नसतील..?
तलाव भरला म्हणून शेतकर्‍यांनी शेतीत केल्या गेलेल्या गुंतवणुकीला जबाबदार कोण..? 

शेतकरी सांगतात 1972 पासून जमीन अधिग्रहण केल्या आहेत, अजून असे कित्येक शेतकरी आहेत त्यांच्या जमिनीचा एक रूपया देखील मोबदला दिला गेला नाही तो मिळणारच नाही का ? 
अनं मिळणारं असेल तर तो कधी देणार? 

काय म्हणायचं या सर्व गोष्टीला, अरे राज्यातल्या सर्व आमदार, खासदारांनो आपल्या पगारी वाढवता त्या कमी म्हणून पेन्शन वाढवून पुढील सोय करता 50 वर्ष झाली तरी अजून शेतकऱ्यांच्या जमिनीला मोबदला मिळत नाही..
कसा जगणार शेतकरी, कृषीप्रधान देश आहे म्हणून जग भर डंका पिटत बसता.

अण या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल का.. अन् ही भरपाई कोण देणार...?
कधी देणार....? 
या प्रकल्प भागातील शेतकऱ्यांच्या पुढील वर्षात होणाऱ्या नुकसानीसाठी प्रशासन पुढे येईल का...?
कधी दुरुस्त होईल तलाव ? 
या भागातील शेतकऱ्यांना उपजिविकेचे प्रश्न आ वासून उभे आहेत त्याच काय..? 

तथाकथित एका अभिनेत्याच्या आत्महत्या ला राष्ट्रीय प्रश्न बनवून CBI चौकशी करणारी आपली व्यवस्था, या भागातील 5 गावातील धरणावर आधारीत कमीतकमी 7000 कुटुंबाची रोजी रोटी हिरावून घेण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या या गोष्टीची चौकशी करेल का..? 
पाणी सोडल्याने नदीकाठच्या शेतकर्‍यांच्या नुकसानला अन् नागरिकांच्या त्रासाला जबाबदार कोण..?

 असे अनेक न संपणारे प्रश्न निर्माण होतात परंतु जोपर्यंत आतापर्यंत दाखवण्यात आलेली वरवरची सहानुभुती मिळवण्यापुरते प्रयत्न केले गेले जातील,फोटोसेक्शन करून सोशल मेडिया वरून आपल्याच हाताने आपली पाठ थोपटून घेतली जात आहे.

मिडियाला रिया चक्रवर्ती, ड्रग्ज प्रकरण,पबजी बॅन हेच महत्त्वाचे वाटेल, युवकांना IPL, Dream 11,मर्यादित माहितीवर अंध विश्वास ठेवून ठरावीक नेत्यासाठी भांडणातुन वेळ मिळेल, तेंव्हाच अशा गंभीर समस्या दिसतील.नाहीतर असे प्रश्न अन् अशा गोष्टी या निर्माण होतच राहतील, घडतच राहतील....

ही  सगळी परिस्थिती पाहता विश्वगुरु वैगरे व्हायचं राहु देवून, स्मार्ट सिटी घडवण्या पेक्षा स्मार्ट जीव वाचवा, महासत्ता होण्याचं स्वप्न एसीच्या रूममध्ये बसून पहायचं सोडून कमीत कमी शेतकरी / नागरिक जगातील एव्हडी तरी काळजी घ्यावी एवढीच कधीच न पूर्ण होणारी अपेक्षा.... !!

✍️ लेखन:- भिलारे एम.एच 
✍️संकलन :- राहुल शिंदे, विभागीय संपादक (9975114800)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध