Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

मराठा आरक्षणासाठी,तरुणाचे आत्मबलिदान...


बीड (राहुल शिंदे) दि.30 तालुक्यातील केतूरा येथील बारावी पास विद्यार्थी विवेक कल्याण रहाडे याने न्यायालयाने मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे आज त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

त्याने बारावी नंतर मेडिकलसाठी नीटची परीक्षा दिली होती. भविष्यात त्याला मोठे डॉक्टर व्हायचे होते, परंतू मराठा आरक्षण हटवल्यामुळे शासकीय कॉलेजला नंबर लागणार नाही व खाजगी कॉलेजचा खर्च परिस्थिती नसल्याने परवडणारा नाही या भीतीपोटी त्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे.

मराठा तरुणांच्या आरक्षणाबत भावना तीव्र व भावनिक आहेत परंतु त्यासाठी आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. न्यायालयाची लढाई चालू आहे, कोणीही हार मानू नये. विश्वास ठेवा, निश्चितच विजय आपला होईल. कृपया आत्महत्येचा विचार करू नका, आपल्या परिवाराचा विचार करा.

आज घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे.
अशा विवेक सारख्या तरुणांचे किती बळी सरकारला हवे आहेत.अशी चर्चा समाज माध्यमातून होत आहे.

विवेकने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिट्टी                       👇

1 टिप्पणी:

प्रसिद्ध