Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारकडून भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे...!



प्रतिनिधी रावेर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारकडून भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे यासाठी लहुजी क्रांती मोर्चा तालुका रावेरच्या वतीने तालुका संयोजक गणेशभाऊ रणशिंगे यांचे नेतृत्वामध्ये सन्मान निय तहसीलदार मॅडम सौ उषारानी देवगुणे मॅडम यांना निवेदन देण्यात आले व मातंग समाजातील लातूर जिल्ह्यातील येवरी तालुका जळकोट मधील मा बालाजी किसन कांबळे या 65 वर्षे वयाच्या माणसाला जातीय मानसिकतेतून त्यांचेवर जो हल्ला झाला, हल्ल्यामध्ये ते मरण पावले, व अशा असंख्य अमानुष अमानवीय हत्त्या, खून समाजात चालूच आहेत, तरुण मुलींवर बलात्काराच्या घटना घडत आहेत, मोब्लिंचिंग घटनांमध्ये वाढ होत आहेत, असे जीवघेणे प्रकार समाजात होत आहेत, याचे विरोधात काळ्या फिती सर्व कार्यकर्त्यांनी हातात बांधून या घटनांचा निषेध नोंदविला व मा तहसीलदार मॅडम यांना1लेखी स्वरूपात सादर केला.
     
प्रसंगी बामसेफचे रावेर तालुका अध्यक्ष मा महेंद्र लोंढे सर, बामसेफचे जिल्हा प्रचारक मा नितीन गाढे, व मातंग समाजातील कार्यकर्ते मा विजय भालेराव सर,रतन भालेराव,आनंद सोनवणे,रवींद्र सोनवणे, नगीनदास जावे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध