Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०
दोंडाईचात येथे भरदिवसा घरा घुसून चाकूचा धाक दाखवून दागिने हिसकाविले...!
दोंडाईचा: प्रतिनिधी विक्रीला काढलेले घर बघण्याचा बहाण्याने घरात घुसून लहान मुलाला चाकूचा धाक दाखवित महिलेच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांची लूट केल्याची घटना भरदुपारी २ वाजेच्या सुमारास दोंडाईचा शहरात घडली़ लूट झालेले दागिने ५० हजार रुपये किंमतीचे आहेत़ घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.
दोंडाईचा येथील शिवकॉलनीतील प्लॉट क्र १७ येथे हेमंत पवार यांचे घर आहे. या घरात रोटरी इंग्लिश स्कूलला उपशिक्षक असलेले भरत निंबाजी पवार भाडेकरु म्हणून वास्तव्यास आहेत. ते शाळेत गेले असतांना पत्नी जयश्री व आठ वर्षाचा मुलगा घरात होते. हेमंत पवार यांचे घर विक्रीला काढले आहे. घर खरेदी करावयाचे असून आम्हास घर बघायचे आहे, या बहाण्याने एक पुरुष, एक महिला व एक मुलगा यांनी घरात प्रवेश केला. जयश्री पवार या किचन दाखवित असताना त्या पुरुषाने गेट लावले तर त्याच्या सोबतच्या मुलाने कपाट उघडले. त्याचवेळी झोपलेल्या मुलाला चाकू लावून त्या महिलेला अंगावरील दागिने काढून घेण्याचे सांगितले़ सोन्याचे मंगळसूत्र व कानातल्या रिंगा हिसकावून घेतल्या. जयश्री पवार जोरात आरोळी मारतील या भीतीने डोक्यात चाकूसारखी वस्तू मारून फेकली. व मोबाईल फेकून देऊन त्याची तोडफोड केली. जयश्री पवार या महिला अतिशय घाबरल्या होत्या.
दरम्यान भरत पवार घरी आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली़ घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, पोलीस उपनिरीक्षक डॉ़ संतोष लोले व पथकाने भेट दिली़ याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी दि. १ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरपूर आगारात प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल...
-
जिल्हा परिषदेला वाळवी प्रमाणे पोखरणाऱ्या बांधकाम विभागातील वाघचा गळ्याचा ताईत असलेला कुणाल नेरकर हा ठेकेदार, जिल्हा परिषद असो की जिल्ह्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा