Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २० सप्टेंबर, २०२०

परंडा तालुका भाजपा युवा मोर्चाच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न...!



परंडा (राहूल शिंदे):- दि.19  देशाचे पंतप्रधान, मा.नरेंद्रभाई मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमीत्त भाजपाच्या वतीने देशभर सेवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणुन,

आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा तालुका भाजपा, व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने परंडा तालुक्यातील चिंचपुर (बु) येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.शिबीराचे उद्घाघाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

या शिबिरात रक्तदात्यांचे अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करूनच रक्त घेतले गेले आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगबाबतही विशेष काळजी घेण्यात आली होती. दोन रक्तदात्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते.शिवाय, स्वच्छतेची विशेष खबरदारी म्हणून वारंवार सिनेटाईझरचा वापर करण्यात येत होता.सोशल डिश्टनशिंगचे पालन व आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे भाजपा युवा मोर्चा परंडा तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांनी बोलताना सांगितले.

राज्यात दररोज साधारण पाच ते सात हजार रूग्णांना विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रूग्णांना रक्ताची गरज असते. कोरोनामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे. शिवाय, उन्हाळी सुट्टीतील अनेक मोठे रक्तदान शिबिर कोरोनामुळे आयोजितच केले गेले नाहीत. त्यामुळे राज्यात अवघ्या काही दिवसांचाच रक्त साठा शिल्लक आहे.असे परंडा पं.स सदस्य सतीष देवकर म्हणाले.

 यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील, जि.प.सदस्य रमेश पवार,भाजपा अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस ॲड.जहीर चौधरी, पं.स.सदस्य सतीष देवकर, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, भाजपा मिडीया सेलचे तालुकाअध्यक्ष निशीकांत क्षिरसागर, तानाजी पाटील, प्रमोद लिमकर, सागर पाटील, शरद कोळी, अशोक भोळे, बाळु गोडगे,महादेव शिंदे, महेश देवकर, भुषण देवकर, सचिन पवार,मेजर हनुमंत शिंदे,विश्व जन आरोग्य सेवा समितीचे परंडा तालुका आरोग्यदूत राहूल शिंदे, दत्ता सुतार, विजय पाटील,जॉकी शिंदे, महाविर जाधव,राम जाधव, बालविर शिंदे,पांडूरंग शिंदे, समाधान देवकर, जोतीराम गिरवले,रणजित काकडे,संभाजी देवकर,ईश्वर देवकर, संजय अनभुले यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते व रक्तदाते  उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध