Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २० सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजाचे नेतृत्व खा.संभाजीराजे भोसले यांनी करावे ...!खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर...!
आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजाचे नेतृत्व खा.संभाजीराजे भोसले यांनी करावे ...!खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर...!
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.20 जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी काल नवीदिल्ली येथे खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांची भेट घेऊन मराठा आरक्षण मिळण्या संदर्भात चर्चा केली व तसे पत्र दिले.
या पत्रात म्हटले आहे की,मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन मोठा लढा दिला आहे,त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण दिले होते.या आरक्षणामुळे मराठा समाजातील गरीब व तरुण लोकांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे.परंतू काही दिवसांपूर्वी मा.सर्वच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असल्याने समाजाच्या भावना दुखावल्या असून समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना एकत्रपणे येऊन याचा विरोध करत आहेत.
राजे आपणांस माझी विनंती की, आपण मराठा समाजाचे नेतृत्व करावे.मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मी स्वतः या लढ्यात आपल्या बरोबर आहे.आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व खासदार व मा.पंतप्रधान साहेब यांच्या समवेत बैठक बोलवावी, ही नम्र विनंती.
असे दिलेल्या पत्रात खा.निंबाळकर यांनी म्हटले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा