Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
समुपदेशन प्रक्रिया राबवून आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांना तातडीने पदस्थापना द्या.
समुपदेशन प्रक्रिया राबवून आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांना तातडीने पदस्थापना द्या.
उस्मानाबाद (राहुल शिंदे)दि.२९आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांना तातडीने समुपदेशन प्रक्रिया राबवून पदस्थापना द्यावी याबाबतची प्रहार शिक्षक संघटनेने जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, शिक्षणाधिकारी प्रा.रामलिंग काळे यांना निवेदना द्वारे करण्यात आली.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग यांचे शासन निर्णय २४ सप्टेंबर २०१७ नुसार आंतर जिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांचे समुपदेशन प्रक्रिया राबवून जिल्हा स्तरावरून थेट शाळेवर पदस्थापना देण्याचे निर्देश आहेत.
आंतर जिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांना तब्बल दीड महिना होत आला तरी अद्यापही समुपदेशन प्रक्रिया राबवून संबंधित शिक्षकांना शाळेवर पदस्थापना देण्यात आलेल्या नाहीत.
बदलीने उपस्थित झालेल्या शिक्षकांना हजेरीपटावर सह्या करणेसाठी दररोज जिल्हा परिषदेला बोलावले जात आहे. आंतर जिल्हा बदलीने जि.प. उस्मानाबादला २८ शिक्षक उपस्थित झालेले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संबंधित शिक्षकांना दररोज सह्यासाठी जिल्हा परिषदेला बोलावणे धोक्याचे ठरू शकते.सह्यासाठी शिक्षकांची होत असलेली गर्दी टाळून कोरोना संक्रमणाचा धोका टाळावा अन्यथा जिल्हा परिषदेवर नामुष्की ओढवू शकते याचा विचार करता तात्काळ समुपदेशन घेऊन शाळेवर पदस्थापना देण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रहार जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत, कार्याध्यक्ष विशाल अंधारे,जिल्हा नेते संतुक कडमपल्ले आदि.पदाधिकारी उपस्थितीत होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा