Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
स्वस्तधान्य दुकानात चक्क चालतोय जुगारअड्डा...! भाजपच्या बड्या नेत्याचे नाव समोर आल्याने खळबळ राष्ट्रवादीने कारवाईसाठी दिले तहसीलदारांना निवेदन..!
स्वस्तधान्य दुकानात चक्क चालतोय जुगारअड्डा...! भाजपच्या बड्या नेत्याचे नाव समोर आल्याने खळबळ राष्ट्रवादीने कारवाईसाठी दिले तहसीलदारांना निवेदन..!
जामनेर: प्रतिनिधी संजय सूर्यवंशी
तालुक्यातील देवपिंप्री येथील भर चौकातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या स्वस्त धान्य दुकानात चक्क जुगारा अड्डा चालतो,या प्रकाराने गावातील वातावरण दुषीत होत असून,विशेष म्हणजे जुगार शौकीन नागरीक खेळण्यासाठी दुरवरून येथे येत असल्याचे ही सांगण्यात येते.
संबंधीत स्वस्त धान्य दुकान हे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष व माजी बाजार समिती सभापती तुकाराम निकम यांच्या पत्नीच्या (सौ लताबाई तुकाराम निकम) नावावर आहे,आणी त्या रास्तभाव दुकानामधे दोन-तीन दिवसात धान्यवाटप करण्यात आले की चक्क जुगाराच्या अड्डयात बदल झालेला पहायला मिळतो.दुसरे विशेष म्हणजे या देवपिंप्रीतील स्वस्त धान्य दुकानातील जुगार सुरू असल्याची चक्क व्हिडीओक्लीप तालुकाभरात फिरू लागल्याने वरील बड्या भाजप नेत्याची चांगलीच गोची झाल्याचे दिसते.
राष्ट्रवादी काँग्रेसची कारवाईची मागणी
या प्रकाराबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत पुरवठा अधिकारी व तहसिलदार अरूण शेवाळे यांचेकडे संबंधीत स्वस्त धान्य दुकानातील जुगार अड्डा बंदकरून परवाना रद्द करण्याची करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली,स्वस्त धान्य दुकानावर प्रशासनाकडुन कायदेशीर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात नमुद करण्यात आलेआहे.
निवेदनाच्या प्रती राज्याचे अन्न-पुरवठा मंत्री,जिल्हाधीकारी,जिल्हा पुरवठा अधिकारी आदींना पाठविण्यात आल्या आहेत.निवेदन देते प्रसंगी राष्ट्रवादी सामाजीक न्याय सेलचे तालुकाध्यक्ष संदिप हिवाळे,पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील,शहराध्यक्ष जितेश पाटील,तालुकाउपाध्यक्ष प्रल्हाद बोरसें सह पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा