Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०
रेशन दुकानांवर अमळनेर प्रांत यांचे आकस्मिक तपासणीचे आदेश .
पंकज पाटील ,उपसंपादक तरुण गर्जना
प्रशासकीय सेवा दीनदुबळ्यासाठी –गोरगरीबांसाठी आहे .पण खरच ती सेवा त्यांच्यासाठी काम करते का ? पुढा-यांसाठी हा प्रश्न जनतेसमोर आजही आहे.
असाच काहीसा प्रत्यय अमळनेर तालुक्यातील प्रांत यांच्या अचानक रेशन दुकानावर केलेल्या कारवाईमुळे आला आहे.
अमळनेर प्रांत यांना तालुक्याचा कार्यभार सांभाळून दीड वर्ष झाला असेल मग दीड वर्षात रेशनचा गैरकारभार,काळाबाजार त्यांना दिसलाच नसेल का ? आताच दोन दिवसापूर्वी एकच दुकानदाराला जोडलेल्या पाच दुकानांची त्यांनी अचानक तपासनी आदेश देवून कारवाई केली.
कारवाई बाबत त्यांच कराव तेवढ कौतुक कमी आहे. दीड वर्षानंतर त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव झाली ही जनतेसाठी समाधानाची बाब आहे .हीच जाणीव तालुक्यातील इतर ही रेशन दुकान दारांबाबत झाली म्हणजे संभ्रम मिटला असे जनतेचे मत होईल.
तालुक्यात एकच रेशन दुकानदाराला पाच दुकान जोडलेली असणारे रेशन दुकानदार किती ? हे त्यांना माहित नसेल का ? मग त्यांच्या दुकानांची चौकशी का नाही ? एकाला तुपाशी व एकाला उपाशी असा भेदभाव अमळनेर प्रांत यांच्या कडून का ? यामागे काही आर्थिक गणित असतील का ? की राजकीय दबाव . अशी चर्चा जनतेत आहे.
अमळनेर तालुक्यातला रेशनचा पुर्ण बाजार हे तालुक्यातील काही निवडक रेशन दुकानदार यांच्या अवतीभवतीच फिरत असल्याचे चित्र आहे. त्या त्रिकुटकडे प्रत्येकी पाच ते सहा रेशनची दुकाने असून त्यातल्या एकावर अमळनेर प्रांत यांनी कारवाईचे आदेश देवून दुकानांची तपासणी केली आहे .
मग उरलेल्या दोघांबाबत देखील हाच पवित्रा अमळनेर प्रांत घेतील का ? दोघांनीच तर एकाचा डाव साधला नसेल ना ? काट्याने काटा काढणे हे रेशन दुकानदारांसाठी नवीन नाहीच.
धान्यात भेसळ करण काय ,रेशनच धान्य बाजारात विकण काय ,जास्तीच्या माणसांची खोटी नावे लावून धान्याची विल्हेवाट लावणे काय . या सर्व गोष्टी सरास अमळनेर तालुक्यात सुरु आहेत. त्याकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांचे कोरोना संसर्गजन्य रोगामुळे सोयीस्कर दुर्लक्ष आहे ते असणे साहजिकच आहे. लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्ष पणाचा फायदा घेत रेशनचा काळा बाजार अमळनेर तालुक्यात चांगलाच फोफावला असून त्याकडे अमळनेर प्रांत व तहसिलदार किती लक्ष घालतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
अमळनेर प्रांत ग्रामीण जनतेला न्याय देत इतर रेशन माफियांवर देखील कारवाई करतील का ? हा देखील प्रश्न जनतेसमोर आहेच.तालुक्यातील इतर रेशन माफियांच्या दुकानांची तपासणी झाली नाहीतर केवळ राजकीय दबावाखाली अधिकारी,कर्मचारी काम करतात असा समज जनतेचा होणे साहजिकच असेल .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा