Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०
बी.एम.एस.निकाल...! सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे केले कौतुक...!
शिरपूर,प्रतिनिधी दि.8 शहरातील आर.सी.पटेल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बी.एम.एस(ई कॉमर्स) या अभ्यासक्रमाचा नुकताच निकाल जाहीर झाला.सदरच्या अभ्यासक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.
धनंजय देवरे याने सीजीपीए 9.52 ग्रेड प्राप्त करून विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला.बी.एम.एस अभ्यासक्रमाचे 14 विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिल्या दहा मध्ये आले आहेत.
यामध्ये प्रथम वर्षातील धनंजय संतोष देवरे याने सीजीपीए 9.52 ग्रेड प्राप्त करून विद्यापीठात प्रथम,अक्षय सुदाम चव्हाण 9.48ग्रेड द्वितीय,भाग्यश्री राजू सुतार 9.38 ग्रेड तृतीय , प्रसाद प्रदीप पाटील 9.31 ग्रेड मिळवत चतुर्थ स्थान मिळवले आहे.
बी.एस.एम द्वितीय वर्षातील 6 विद्यार्थी टॉप टेनमध्ये आले आहेत.
हर्षल संतोष भोई व नरेश मनोज अग्रवाल यांनी 9.57ग्रेड मिळवत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत द्वितीय,शिवाजी निंबा पाटील 9.29ग्रेड मिळवत तृतीय,आदित्य दीपक पंजाबी 9.14ग्रेड मिळवून पाचव्या स्थानी येण्याचा मान मिळवला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थापक अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, संस्थेचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल,नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल आदींनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा