Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

माझे कुटुंब माझी जबाबदारी कोविड युक्त महाराष्ट्र या मोहिमेत अंगणवाडी कर्मचारी यांना समाविष्ट न करणे बाबत




नंदूरबार प्रतिनिधी: दिनांक 21-9-2020 रोजी नंदूरबार जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी कोविड युक्त महाराष्ट्र या मोहिमेत अंगणवाडी कर्मचारी यांना समाविष्ट न करणे बाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी(जि.प.) व मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा. क) यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच 1 सप्टेबर 2020 पासून पोषण महा अभियान राबविले जात आहे. 

त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी यांच्यावर कामाचा व्याप वाढलां असल्याने सदर काम अंगणवाडी कर्मचारी यांना देण्यात येऊ नये यासाठी आज  निवेदन देण्यात आले.तसेच  तालुका प्रमुख उपस्थित होते.कार्याध्यक्ष-युवराज बैसाने.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध