Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर उपजिल्हा रुग्णालय आवारात घाणीचे साम्राज्य, मोठे झाडे, झुडपे व रस्ता खराब सा.बां विभागाने लक्ष द्यावे..! भाजपाचे अरुण धोबी...!
शिरपूर उपजिल्हा रुग्णालय आवारात घाणीचे साम्राज्य, मोठे झाडे, झुडपे व रस्ता खराब सा.बां विभागाने लक्ष द्यावे..! भाजपाचे अरुण धोबी...!
शिरपूर :शिरपूर शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथील आवारातील रस्ता अतिशय खराब झालेला असुन शिवाय काटेरी झाडे-झुडपे वाढलेली आहेत गटारी खराब झालेल्या आहेत त्यामुळे घाणीचे साम्रज्य मोठ्या प्रमाणात आहे.
या सर्व कारणामुळे सर्व सामान्य जनता, रुग्ण व रुग्णाचे नातलगांना खुपच त्रास होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
माजी मंत्री अमरीशभाई पटेल, आ. काशिराम पावरा,भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा मार्गदर्शनाखाली धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी कोमलसिंग गिरासे अभियंता उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ शिरपूर यांना (दि. २१ सप्टेंबर) रोजी मागणीचे निवेदन दिले. निवेदन देतेवेळी भाजपा अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, भाजपा मा. शहर सरचिटणीस सुनिल चौधरी उपस्थित होते. निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधखकाम मंत्री ना. अशोक चव्हाण, आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, ना. अब्दुल सत्तार, कार्यकारी अभियंता रोहयो बांधकाम विभाग धुळे, उपजिल्हा रुग्णालय शिरपूर यांना हि पाठवण्यात आल्या आहेत. निवेदनात पुढे नमुद करण्यात आले आहे कि शिरपूर उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत रस्तांवरील खड्डयांमुळे रुग्ण व नातलग त्रस्त झाले आहेत. रुग्ण्यालय अंतर्गत रस्ता ९०% टक्क्यांपेक्षा जास्त खराब असुन रस्ता दुरुस्त केला तर ठिगळ लावल्या सारखे होईल म्हणुन रस्ता पुर्णपणे नविन बनविण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे. तसेच झाडे, झुडपे तोडण्यात यावेत व गटारी मधील घाण काढण्यात यावे यासाठी शिरपूर सार्वजनिक बांधकाम विभाग व उपजिल्हा रुग्णालयाने समन्वयने याकामाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा व रुग्णालयात येणारे रुग्णाचे होणारे हाल थांबवावे. तरी कृपाया वरील समस्या बाबत लवकरात लवकर सुस्थितीत करुन द्याव्यात अशी मागणी भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा