Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०
बकऱ्या चारताना वाहून गेलेल्या तिघांनपैकी अजून एकाचा मृतदेह सापडला...!
खामगाव:प्रतिनिधी: तालुक्यातील माक्ता कोफ्ता येथील बोर्डी नदीकाठी बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या बाप लेकासह अजून एक जण वाहून गेल्याची घटना काल सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली होती. यामध्ये दिलीप नामदेव कळसकर वय 42 याचा मृतदेह दुपारी शोधला असता गावाजवळ मिळून आला. तर त्यामधील गजानन लहानु रणशिंगे वय 38 व मुलगा राहुल गजानन रणसिंगे वय 16 हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते.
काल पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांनी सायंकाळपर्यंत शोध घेतला, मात्र ते दोघं मिळून आले नाही. आज 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास जलंब पोलिस स्टेशन हद्दितील मोरगाव येथील नदीपात्रात गजानन रणसिंगे यांचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना गावातील नागरिकांना दिसून आला.
तात्काळ नागरिकांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला वमाहिती पोलिसांना कळवली, घटनेची माहिती मिळताच जलंब पोलीस घटनास्थळी पोहोचले व मृतकाचा पंचनामा करून शवविच्छेदनात पाठवण्यात आले होते.
गजानन रणसिंगे यांचा मुलगा राहुल रणसिंगे याचा शोध घेण्याचे काम अजुनही सुरु आहे.
या काल घडलेल्या दुःखद घटनेमुळे माक्ता शिवारात शोककळा पसरली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा