Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

रेल्वे स्टेशन जवळील वळणमार्गावर गतिरोधक बसविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी....!



शेगांव: प्रतिनिधी उमेश राजगुरेशहरातील रेल्वेस्टेशन परिसरात पंचायत समिती तहसील कार्यालय, पंचशील नगर, स्वयंभू नगर तसेच सेंट झेवियर व बाजूच्याच कॉम्प्लेक्समध्ये लोकोपयोगी दुकाने असल्याने या ठिकाण पायी जाणारे तसेच दुचाकीसह इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेला हा मार्ग अतिशय गजबजलेला दिसून येतो या ठिकाणाहून वाहने भरधाव वेगाने जात असल्याने अनेक वेळा या ठिकाणी अपघात घडलेले आहे.

यापुढे या ठिकाणी अपघात घडू नये याकरिता वंचित बहुजन आघाडीचे शाखाध्यक्ष अंबादास सहारे तसेच पदाधिकारी यांच्याकडून शेगाव मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन  या वळणमार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी शाखाध्यक्ष अंबादास सहारे, किशोर कांबळे वंचित बहुजन आघाडी शहर उपाध्यक्ष,निलेश वानखडे ऑल इंडिया पॅंथरसेना,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अमित पहुरकर ऑल इंडिया पॅंथरसेना सचिव दीपक इंगळे आंबेडकरी कार्यकर्ते प्रवीण पहुरकर मनोज पहुरकर अहिंसक वानखडे आशिष इंगळे मंगेश इंगळे प्रकाश तायडे रोशन इंगळे जय मोरे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध