Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

पाळोदी येथे बस सेवा सुरू करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रहारचा इशारा...!



शेगाव तालुका प्रतिनिधी उमेश राजगुरे
शेगांव तालुक्यातील पाळोदी हे गाव शेगांववरून १० कि.मी अंतरावर आहे. १४ फेब्रुवारी २०२० रोजी येथील ग्रामस्थांनी बस सेवा सुरू करण्यासाठी आगार प्रमुख यांना पत्र दिले होते परंतु आतापर्यंत पाळोदी या गावात बससेवा सुरू झाली नाही.या भागातील शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी वाहन व्यवस्था नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

आगार व्यवस्थापकांना देण्यात आलेल्या अर्जाला आतापर्यंत जवळपास 7 महिने पूर्ण होत आहेत.परंतु आगार प्रशासनाकडून ग्रामस्थांना कुठलाही पत्र व्यवहार तसेच गावकऱ्यांच्या पत्राला कुठलाही प्रतिसाद न देता पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.

करीता शेगांव आगार प्रशासनाला स्मरण पत्राद्वारे गावकऱ्यांनी विनंती केली आहे की,येत्या 15 दिवसात न्याय न मिळाल्यास समस्त गावकऱ्यासह शेगांव आगार
प्रसासनाविरुद्ध लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल.व होणाऱ्या नुकसानास संबंधित प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील.याची प्रशासनाने नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन प्रहार संघटनेचे पाळोदी शाखा अध्यक्ष विजय फुलकर यांनी आगार व्यवस्थापकांना दिले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध