Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

ह.भ.प रामदास महाराज यांचे दुःखद निधन.! ! !




पंढरपूर (राहूल शिंदे)दि.25 मराठा सेवा संघाचे आधारस्तंभ,शिवधर्म समर्थक व संत कैकाडी महाराज मठ श्रीक्षेत्र पंढरपूर चे कैकाडी महाराज यांचे पुतणे मठाधिपती ह.भ.प शिवराज महाराज जाधव ( रामदास महाराज ) यांचे आज दुपारी 4:00 च्या दरम्यान अकलूज येथे उपचारादरम्यान दुर्दैवाने निधन झाले आहे.

ह.भ.प शिवराज महाराज यांच्या आकस्मिक निधनामुळे बहुजन चळवळी व बहुजन समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. मराठा सेवा संघ संचलित संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.

वारकरी संप्रदायात सुधारणा वादी किर्तनकार ही महाराजांनी ओळख निर्माण केली होती. सुमारे तीस वर्षांपासून महाराजांनी किर्तनात जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले , शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत होते... महाराजांनी अनेक वैज्ञानिक किर्तनकार प्रवचनकार वक्ते घडवलेले आहेत.

ईश्वर त्यांच्या सर्व कुटुंबातील सदस्यांना व भक्तांना सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना...

महाराजांना भावपूर्ण श्रध्दांजली ! ! !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध