Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

जिल्हास्तरीय आहार समिती बैठक... जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न ! !



उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.25 जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आहार समितीची बैठक घेण्यात आली असून यावेळी प्रकल्पनिहाय आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, एम. एस. आर. एल. एम. यांनी समन्वयाने काम करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या.

या बैठकीस जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अनिलकुमार नवाळे, जिल्हा परिषदचे महिला व बाल कल्याण सभापती सौ.रत्नमाला टेकाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.)निपाणीकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या श्रीमती कुलकर्णी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी तसेच जिल्हयातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थितीत होते.असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध