Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०
शिरपूर तालुक्यात शोकाकुल परिवाराने कोरोना काळात घातला एक आदर्श...!
शिरपूर तालुक्यातील अर्थे खुर्द गावातील रहिवासी तसेच एच.आर.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरपूर येथील प्राचार्य आर .बी. पाटील यांच्या मातोश्री कै. चिंधाबाई भगवंतराव पाटील यांचे वृद्धापकाळाने दिनांक 24 सप्टेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी दुःखद निधन झाले. अंत्ययात्रा प्रसंगी मित्रपरिवार व नातलगांनी येऊ नये. तसेच दारदर्शनाला ही कोणी येऊ नये.असा संदेश व्हाट्सअप व फेसबुकच्या माध्यमातून अर्थे खुर्द येथील गुजर पाटील परिवाराने दिला. कृपया कोरोना काळ असल्याने नातेवाईक मित्रमंडळी यांनी गर्दी करण्याचे टाळावे.
शोकाकुल परिवाराचे हे आवाहन व घेतलेला निर्णय निश्चितच कोरोना चा प्रसार व प्रादूर्भाव रोखण्यास साहाय्यक ठरणार आहे.सध्या राज्यात, देशात, तसेच जगात कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे.
अशा काळात शोकाकुल परिवाराने असा निर्णय घेणे खरोखर स्तुत्य व समाजाला दिशादर्शक आहे. आणि असाच आदर्श प्रत्येक समाज घटकाने घ्यावा. म्हणजे कोरोनाची साखळी आपण तोडू शकू . शासनाच्या महसूल पोलिस आणि आरोग्य विभाग कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी प्रयत्नशील असताना नागरिकांकडून साहाय्य होणे अपेक्षित आहे,
नियमांचे पालन करणे गरजेचे आहे अशावेळी आईच्या निधनाने दुःखद प्रसंग असतानाही शोकाकुल परिवाराने अशा प्रकारच्या निर्णय घेऊन इतर समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
समाजप्रबोधनपर संस्कार करणाऱ्या दिवंगत आदर्श मातेला सुबोध संदेश न्यूज नेटवर्क परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धाजंली .
शोकाकूल
रमणलाल भगवंतराव गुर्जर,
रविद्र भगवंतराव गुर्जर
अरुण भगवंतराव गुर्जर
प्रा. गुलाब भगवंतराव गुर्जर
रणछोड भगवंतराव गुर्जर
(प्राचार्य एच.आर.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरपूर)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा