Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

वादळी वाऱ्याने ऊसाचे पीक भुई सपाट,तात्काळ पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी....!




परंडा(राहुल शिंदे) दि.7 तालुक्यातील पांढरेवाडी व परिसरात रविवारी सायंकाळी  मेघगर्जेनेसह जोरदार वादळी वाऱ्याने व हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने खरीप पिकाला काही प्रमाणात जीवदान मिळाले. तर दुसरीकडे काढून ठेवलेला उडीद झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली,  ऊसाचे उभे पीक भुईसपाट झाल्याच्या घटना‍ घडल्या आहेत. 

मोठ्या क्षेत्रावरील ऊस वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप कोणत्याच कारखान्याचा गळीत हंगाम सुरु नसल्याने पडलेल्या ऊसाला उंदीर लागून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

मागील पंधरा दिवसापासून पावसाने ओढ दिली होती.अचानक आलेल्या पाऊसाने, ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पंचनामा करुन त्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावे. अशी मागणी पिडीत शेतकरी वर्ग करत आहे.

याची प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करावे.




1 टिप्पणी:

  1. याची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी. एक शेतकरी

    उत्तर द्याहटवा

प्रसिद्ध