Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २७ सप्टेंबर, २०२०
कोकरवाडीत, प्रशासक भोसले यांनी स्वीकारला पदभार !!!
परंडा(राहूल शिंदे)दि.२७ तालुक्यातील कोकरवाडी येथील सरपंच कलावती अभिमान टिकोरे यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासक म्हणून तांदुळवाडी केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक भोसले टी.एस यांनी पदभार स्वीकारला.
कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती साथरोग अधिनियम १९९७ ची सुरू झालेली अंमलबजावणी व राज्यात साथरोगाचा प्रादुर्भाव प्राधान्याने रोखण्यासाठी आवश्यकता व राज्यातील प्रस्ताविक निवडणुकांमध्ये वाढणारी तीव्र जोखीम या पार्श्वभुमीवर पुढील कोरोना संपेपर्यंत शासनाने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.
जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक जुलै ते डिसेंबर या कालावधीत असल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहेत.
यातील ज्या ग्रामपंचायतीच्या कमिटीची मुदत ज्या दिवशी संपते त्याच दिवशी रात्री १२ वाजतानंतर प्रशासक बसविला जात आहे. ग्रामीण विकास विभागाने कोरोना संपेपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
विस्तारअधिकारी, केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक यांच्या नेमणुका ग्रामपंचायत प्रशासक म्हणून करण्यात येत आहेत.
कोकरवाडी येथे नवनियुक्त प्रशासक भोसले टी.एस यांचा ग्रामपंचायतींच्या वतीने सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या,यावेळी ग्रामसेवक भिल्लारे एस.डी,तलाठी ढोणे जी.जी, कृषीसहाय्यक जाधव के.के, कलावती अभिमान टिकोरे , लक्ष्मी भीमा माळी, गोरख कदम,गणेश मांगले, संभाजी टिकोरे,राजेंद्र मलंगनरे दगडू माने आदी सह ग्रामस्थ कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून उपस्थितीत होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा