Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २७ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांना, विविध प्रश्नासंदर्भात आ.बाबासाहेब पाटील यांचे निवेदन...
राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांना, विविध प्रश्नासंदर्भात आ.बाबासाहेब पाटील यांचे निवेदन...
अहमदपूर (राहूल शिंदे) दि.27 मराठवाड्यात गेल्या आठवडाभराच्या अति पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले आहे.नुकसानीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे आज मराठवाड्याच्या दौर्यावर आले आहेत. आज दुपारी तीन वाजता कृषी मंत्री आले असता त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात तसेच अहमदपूर -चाकूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रश्नासंदर्भात निवेदने दिली.
यात प्रामुख्याने मतदारसंघाचा समावेश पोखरा योजनेत करून मतदारसंघाच्या गावातील जनतेला न्याय द्यावा अशी प्रमुख मागणी केली, त्याचबरोबर अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ऊस सोयाबीन अशा विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे यासंदर्भात शासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत देण्याची विनंती आ.बाबासाहेब पाटील यांनी राज्याच्या कृषीमंत्र्यांना केली. त्याच बरोबर मतदार संघातल्या झालेल्या नुकसानीचा आढावा कृषीमंत्री यांच्या समोर सादर केला .
यावेळी कृषीमंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेत या मतदारसंघात झालेल्या सर्व नुकसानीचा पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न या राज्याचा कृषीमंत्री म्हणून मी करणार असल्याचे सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बेटावद / शिरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इ...
-
शेळगावातील तरुणांचा दारूबंदीचा निर्धार; ग्रामस्थांच्या वतीने माजी सैनिकासह दोघांचे आमरण उपोषण परंडा, दि. १२ : शेळगाव ग्रामसभेने ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा