Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
कुक्कडगाव येथे ''विश्व जन आरोग्य सेवा समिती'' व ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न...!
कुक्कडगाव येथे ''विश्व जन आरोग्य सेवा समिती'' व ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न...!
परंडा (राहूल शिंदे ) दि.9 देशात व राज्यात कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.रक्ताची गरज देखील मोठ्या प्रमाणात लागत आहे त्या पार्श्वभूमीवर''विश्व जन आरोग्य सेवा समिती'' व ग्रामस्थ कुक्कडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान शिबीर घेण्यात आले. सकाळी 10 वाजता छत्रपती प्रतिमा पूजन परंडा तालुका बालविकास अधिकारी मा.श्री.नारायण गायके साहेब व गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री.एकनाथ वायसे यांच्या हस्ते करून शिबिरास प्रारंभ झाला.या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले, विशेष बाब म्हणजे मा.श्री.नारायण गायके साहेब यांनी सर्व प्रथम रक्तदान करून सहभाग नोंदवला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते.
त्याला प्रतिसाद देत,''विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या''संस्थापक अध्यक्षा श्रीमती.छायाताई भगत यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातअनेक ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात,गर्दी टाळत रक्तदान शिबीर घेण्यात आले.
भगवंत रक्तपेढी बार्शी यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदात्यांचे अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करूनच रक्त घेतले गेले आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगबाबतही विशेष काळजी घेण्यात आली होती. दोन रक्तदात्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते.महिलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता. शिवाय, स्वच्छतेची विशेष खबरदारी म्हणून वारंवार सिनेटाईझरचा वापर करण्यात येत होता.सोशल डिश्टनशिंगचे पालन व आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे सोमनाथ कोकाटे यांनी बोलताना सांगितले.
राज्यात दररोज साधारण पाच ते सात हजार रूग्णांना विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रूग्णांना रक्ताची गरज असते. कोरोनामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे. शिवाय, उन्हाळी सुट्टीतील अनेक मोठे रक्तदान शिबिर कोरोनामुळे आयोजितच केले गेले नाहीत. त्यामुळे राज्यात अवघ्या काही दिवसांचाच रक्त साठा शिल्लक असल्याची माहिती स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. शिवाय, छोट्या स्तरावर रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे आवाहनही केले होते.
सर्व रक्तदाते सोशल डिश्टनसिंगचे पालन करून उपस्थितीत होते. सोशल डिस्टंसिंग सह अन्य उपाययोनांचेही समितीच्या कार्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
ग्रामीण भागात लहान लहान रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली जावी.यामुळे गरजू रुग्णांची रक्ताच्या बाबतींत होणारी गैर सोय टळेल असे श्री.भगवंत रक्तपेढिचे श्री.गणेश जगदाळे यावेळी म्हणाले.
यावेळी सोमनाथ कोकाटे जिल्हा समन्वयक विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य शाखा धाराशिव तथा जिल्हाध्यक्ष विश्व जन मराठा संघ धाराशिव, विश्व जन आरोग्य सेवा समितीचे परंडा तालुका आरोग्यदूत तथा तरुण गर्जना विभागीय संपादक श्री.राहुल शिंदे, पंढरी मेडिकल बारामतीचे श्री.अमोल वायसे,तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी पाटुळे, पोलीस पाटील श्री.विनोद निरवने आदी उपस्थितीत होते.प्रत्येक रक्तदात्यास विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या वतीने कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा