Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०
जिल्हयातील जास्तीत जास्त महिलांनी , पंतप्रधान मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा! ! !
उस्मानाबाद(राहुल शिंदे)दि.28:- जिल्हयात केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना माहे-जानेवारी 2017 पासून राबविण्यात येत असून या योजने अंतर्गत पहिल्यांदा गरोदर असलेल्या मातेस पहिल्या जिवंत अपत्या पर्यंत सर्व स्तरातील रु.5000/- चा लाभ तीन टप्प्या मध्ये संगणक प्रणाली व्दारे लाभार्थीच्या आधार संलग्न खात्यावर जमा केला जातो.त्यानुसार आज पर्यंत ग्रामीण व शहरी भागात 28501 लाभार्थीला रु.11 कोटी 51 लाख लाभार्थीना लाभ देण्यात आलेला आहे.
उस्मानाबाद जिल्हयात कोविड-19 या कालावधी मध्ये 3461 गरोदर मातांना 1 कोटी 64 लाख 30 हजार लाभ देण्यात आलेला असुन सदर लाभा मध्ये मातेच्या सकस अहार अंशःत बुडीत मजुरी साठी हा लाभ देण्यात येतो. लाभार्थी मातेस लाभ घेण्यासाठी मातेचे आधार कार्ड, पतीचे आधार कार्ड, गरोदर मातेचे आधार सलग्न बैंक/पोस्ट खाते व माता बाल संगोपन कार्ड झेरॉक्स प्रत, बाळाचे जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
या योजनाची अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य संस्था/ए.एन.एम./आशा स्वयंसेविका/अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा व या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.जी.नवाळे यांनी केले आहे.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, बाह्य संपर्क विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन बोडके, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. सोपल सहा. संचालक कुष्ठरोग , डॉ.रफिक अंसारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एम. आर. पांचाळ व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. किरण गरड बैठकीस उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा