Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

मातृशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय सहसचिव पदी माधुरी शर्मा यांची निवड....!



महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावर स्थापन झालेल्या मातृशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय सहसचिव पदी माधुरी शर्मा यांची निवड करण्यात आली मातृशक्ती संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय समितीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष सौ वैशाली ताई तायडे यांनी माधुरी शर्मा यांच्या नावाची घोषणा केली 

मातृशक्ती संघटनेच्यावतीने लॉक डाउन काळात गोरगरीब मुलांना भोजन वाटप व मास्क वाटप महिलांसाठी आरोग्य शिबीर बेटी बचाव बेटी पढाव अभियान झाडे लावा झाडे जगवा अभियान आदी विविध उपक्रम राबविण्यात येतात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांचा महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी मातृशक्ती संघटनेच्या वतीने गती मिळावी या उद्देशाने माधुरी शर्मा यांची निवड करण्यात आली

सौ राजश्री राजकुमार व्यास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या राष्ट्रीय समितीच्या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष सौ वैशाली ताई तायडे राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ अर्चनाताई ठाकरे राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ रूपालीताई वानखडे राष्ट्रीय सचिव डॉक्टर शबनम शेख राष्ट्रीय कोषाध्यक्ष सौ मुक्ताताई ठाकूर ज्येष्ठ सदस्य सौ गीता ताई वाघ सौ रेखा शेळके आदी उपस्थित होत्या


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध