Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

धुळे जिल्ह्यासह तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करा...!



भाजपा युवा नेते राम भदाणे यांची मागणी..! जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

धुळे :प्रतिनिधी २३: धुळे जिल्ह्यासह धुळे तालुक्यात वादळी पाऊस रोजच होत असून यावर्षी सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस झाला आहे. यावर्षी सुमारे ९०० ते ११०० मीमी पर्यंतची पावसाची नोंद झालेली आहे. यावर्षी  पावसाळयात सुरवातीला काही भागात लवकर पाऊस तर काही भागात उशीराने पावसाला सुरवात झाली. परंतू नंतर पावसाचे प्रमाण वाढले. त्यामुळे सर्व प्रकारची पिके चांगली दिसत होती. 

शेतकऱ्यांनी मुग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी, तुर, भुईमुग, सोयाबीन, कापूस व फळ बागायात लावणी केली होती. यांत यापुर्वीच जास्तीच्या पावसामुळे उडीद, मुग शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहेत. आता शेतात राहिलेली पिकांचे देखिल नुकसान झालेले आहे. कापूस ओला झाला असून खराब झाल्यामुळे कापसाला व्यापारी भाव देत नाही. इतर पिकांची देखिल तीच परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे शासनाने धुळे जिल्ह्यासह तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत जाहिर करावी अशी मागणी भाजपा  नेते तथा जि.प.सदस्य राम भदाणे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. 

यंदा पावसाची धुळे तालुक्यातील सरासरी नोंद ही सुमारे ९०० ते ११०० मीमी पर्यंत झाली आहे. त्यामुळे शासनाने धुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. सद्या कापूस, बाजरी,ज्वारी व इतर पिकेकाढणीला आले असतांना वादळी व सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसामुळे कापसाचे व इतर पिकांची मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या पावसामुळे पडून गेलेला आहे. शेतकऱ्यांच्या पदरी नेहमीप्रमाणे निराशाच आली आहे. 

यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी सरकारने सद्याची परिस्थिती पाहता धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई द्यावी व ओला दुष्काळ जाहीर करावा. असे या निवेदनात भाजपा युवा नेते राम भदाणे यांनी म्हटले आहे.

धुळे तालुक्यात सततचा दुष्काळ असून मागील वर्षी देखिल अतिवृष्टीमुळे शेकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले होते. तसेच कोरोना महामारीमुळे आलेल्या रब्बी पिकाला देखिल बाजारपेठ मिळालेली नाही. तेव्हाही शेतकऱ्याचे नुकसानच झाले. रब्बी पिकांच्यावेळी हि परिस्थिती होती. 

यंदाही अश्याच परिस्थिमुळे शेतकरी हवालदील झाला असून  शेतकऱ्यांच्या डोळयासमोर जगाव की मराव असा प्रश्न उभा राहिला आहे. शेतकऱ्यांना यावर्षी मोठी आशा होती, कारण सर्व पिके मोठ्या जोमात होती, दमदार पिकांमुळे मोठ्या प्रमाणात पिक येईल अशी आशा असतांना वादळी पावसाने व सरासरीपेक्षा जास्ती पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे  या नुकसानीने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने तत्काळ आर्थिक मदत जाहिर करावी असेही या निवेदनात म्हटले आहे.
सततच्या या निराशामुळे धुळे तालुक्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतच आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची फार मोठी गरज असून शासनाने भरगोस मदत द्यावी. सद्यातरी असे चित्र आहे की, कोणतेच पीक शेतकऱ्यांच्या हाताशी येणार नाही. आपल्या शेतीप्रधान देशात शेतकरी राजाला बळ देणेसाठी महाराष्ट्र सरकारने अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी मदत करणे गरजचे आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भाजपा नेते तथा जि.प.सदस्य राम भदाणे यांनी सरकार विरोधात संघर्ष उभा करु असेही या निवेदनात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध