Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
नंदुरबार, धडगाव तालुक्यातील पलासझाडी आणि शेंद्रापाडा ग्रामस्थांकडून रस्त्याची मागणी...! येथील रुग्णांना आजही बांबूलन्स द्वारे न्याव लागतं...!
नंदुरबार, धडगाव तालुक्यातील पलासझाडी आणि शेंद्रापाडा ग्रामस्थांकडून रस्त्याची मागणी...! येथील रुग्णांना आजही बांबूलन्स द्वारे न्याव लागतं...!
धडगाव प्रतिनिधी जितेंद्र ढोले:धडगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही प्राथमिक सोयीसुविधा मिळालेल्या नाही. ग्रुप ग्रामपंचायत वेलखेडी येथील पलासझाडी आणि शेंद्रापाडा या गावांमध्ये पाणी, रस्ते,आरोग्य,सुविधांची वानवा आहे.
येथील ग्रामस्थांनी पलासझाडी ते कुवरखेत पर्यंत 12 किलोमीटरच्या रस्त्यासाठी तहसील कार्यालय, स्थानिक आमदार-खासदार यांच्याकडे वारंवार मागणी करूनही रस्त्याचे काम झालेले नाही. लोकप्रतिनिधींनी निवडणुकीच्या दरम्यान दिलेले आश्वासन पूर्ण का केले नाही असा सवाल गावातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळींनी उपस्थित केला आहे.
पलासझाडी ते कुवरखेत 10 ते 12 किलोमीटर दर्या-खोर्यातून पाय वाट काढत आजारी रुग्णांना बांबुलन्स द्वारे न्याव लागतं. कुवरखेत येथे गाडी मिळाली नाही तर पुन्हा गुंडांनचापाडा पर्यंत 5 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. त्यानंतर खाजगी वाहनाने 40 किलोमीटर लांब धडगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी जावे लागते. शासनाने आता तरी आमच्याकडे लक्ष देऊन प्राथमिक सोयी सुविधा पुरवाव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा