Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०
कष्टमय जीवनाला यशाचे झालर लावणारे..! श्री दामोदर विठ्ठल माळी...!
मालपूर.शिंदखेडा या आदर्श शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेताहेत कृषी महाविद्यालयाचे कृषि दूत निखिल खैरनार
कृषि महाविद्यालय पुणे येथील कृषिदूत निखिल खैरनार यांनी जाणून घेतली श्री दामोदर विठ्ठल माळी (मोठा भाऊ) यांची जीवन गाथा या जीवनात परंपरेनुसार संसारात,कुटुंबात,भाऊबंदकीत संपत्तीच्या नावाखाली चाललेला संघर्ष झाल्याचा हा इतिहास तुम्ही आम्ही सर्वांनी वाचला आणि अभ्यासला आहे.
मग तुमच्या माझ्यासारख्या सर्व सामान्य माणसाच्या जीवनात येणारा संघर्ष आपणास झेलावाच लागेल . म्हणून की काय आपल्या संसाराच्या वाटेवर कितीतरी महाकाय संकट आली.
आणि या संकटाला तोंड देण्यासाठी निष्ठा व नितीमत्तेची ढाल आणि सत्येची तलवार करून संकटाच्या छातीवर पाय देऊन विठ्ठलाच्या आशीर्वादाने विजयाची पताका झडकावली ते म्हणजे शिंदखेडा तालुक्यातील मालपूरचे प्रगतशील शेतकरी श्री विठ्ठल माळी यांचे मोठे चिरंजीव श्री दामोदर मोठा भाऊ माळी यांचं खास करून समाजापुढे आदर्शवत असा दाखला देता येईल.आपल्यावर आलेल्या संकटांचा इतिहास कथन करतांना व त्यावेळी परिस्थिती चा लेखाजोखा मांडतांना त्या आठवणी सांगतांना दामोदर मोठा भाऊ यांचे डोळे भरून येतात. आज मोठा भाऊंच कुटुंब सुखी आणि खूपच समाधानी आहे . मोठा भाऊ च्या वडिलांचे नाव विठ्ठल खरे वडील विठ्ठल पांडुरंगासारखे निर्मल ,मवाळ, माळकरी अध्यात्माची गोडी,लढा जिव्हाळा त्यांच्यात दिसून येतो.
मोठा भाऊ ची आई केशरभाई म्हणजे त्याच्या घरातली विठ्ठलाची रखुमाईच शोभेत आपुलकी जिव्हाळा ,प्रेमळ स्वभाव हे या कुटुंबाचे वैशिष्ट्ये आहे .
आलेल्या पाहुण्यांचे गोड कौतुक करण्याचा त्यांचा स्वभाव त्यांच्या वागणुकीतून सहज लक्षात येतो. सन 1960 पासून विठ्ठल नानांनी गाई गुरे चारतील. गाई माय समजून आईप्रमाणे सेवा केली. एवढेच नाही तर विठ्ठल नानांनी दुसऱ्याच्या घरी 15 वर्षे सालदारकी केली.
एवढे मोठे कष्ट उपसून शेवटी शेतजमिनिवरून भावाभावांमधील वाद हे खूप मोठे दुःख वाट्याला आले . अशा या वादाला तोंड देत कोरडवाहू शेतीत नानांनी खूप मोठ्या मनाने आपल्या कुटुंबाच्या सत्येच्या वाटेवर सत्यम शिवम सुंदरम ... म्हणत न डगमगता धैर्याने आपल्या कुटुंबासोबत बिकट वाट चालत राहिलेत. सन 1994 मध्ये मात्र म्हणतात ना ! ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय या प्रमाणे साक्षात भगवान विठ्ठलाच्या रूपाने त्या गाय माऊलींच विठ्ठल नानांच्या परिवारात आगमन झाले. लक्ष्मीच्या रूपाने आलेल्या गाय माऊलीने विठ्ठल नाना माळी आणि दामोदर मोठा भाऊ यांच्या परिवाराला असा काही आशिर्वाद दिला की, या गाय माऊलीला 17 जावपे झालीत. आणि त्यांच्या गोठ्यात खूप मोठा गोताळ्याच्या रूपाने भरभराटी निर्माण झाली.
या 12 हजाराच्या गाईने सात लाखापर्यंत चे तिच्यापासून 40 गुरांची विक्री करून एवढ्या उत्पन्नाची साथ या लक्ष्मी सारख्या गाईने विठ्ठल नानांच्या कुटुंबाला दिली.
या कुटुंबाच्या प्रगतीला विठ्ठल नाना आणि केशर माय ही दोघ साक्षर व नीतिमत्ता शुद्ध आणि सत्याने केलेली वाटचाल हीच खरी कुटुंबाच्या प्रगतीचे वैशिष्ट्ये सांगता येतील. विठ्ठल नाना नेहमीच सांगतात, टिळा लावा नई ना ! ना मळा ! टाकी नई ,फक्त शुद्ध मनाने पांडुरंगाची वाटच चालत राहिलो. जसे सावता महाराज पंढरपूरला गेले नाही. तसच नानांनाही कधीच भक्तीचा आव आणला नाही.
केले कर्म झाले तेचि भोगा आले ! उपजले मेले ऐसे किती! जैसी स्थिती आहे ! तैश्याच परी राहे ,कौतुक तू पाहे सचितांचे...अशा कितीतरी ओव्या अभंगाच्या नानांच्या मुखातून नाचत असतात. अश्याच खऱ्या भक्तीच्या रूपाने नाना आणि परिवार पांडुरंगाच्या चरणी लिन होतात. विठ्ठल नानांच्या संसाराच्या वेलीवर 3 मुले व 1 मुलगी असे 4 अपत्य जन्माला आली. विठ्ठल नानांच्या कष्टाच्या कळा पाहून त्यांचा मोठा मुलगा दामोदर मोठा भाऊ यांनी वडिलांच्या कष्टाला साथ देत खांद्याला खांदा लावून संसाराची धुरा सांभाळली. भाऊबंदकी च्या संपत्तीच्या वादावरून आलेल्या संकटांना मोठा भाऊनी ही मोठ्या ताकदीने तोंड देत सामना केला. दामोदर भाऊंनी बी ए चे शिक्षण अपूर्ण सोडले . मध्येच आय टी आय साठी फॉर्म भरला . पण शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न ,शेतीवर अवलंबून असलेले जीवन ,यांच्यात मात करण्यासाठी,मोठा भाऊंना मालपूर अमरावती मध्यम प्रकल्पाचे काम चालू असल्याची माहिती मिळाल्याने तेथे जाऊन तेथील सुपरवायझर ला विनंती करून स्टोर किपर म्हणून नोकरी मिळाली. रिकाम्या हातांना काम मिळाले.तेथुन मात्र परिस्थिती सुधारल्या नंतर दामोदर मोठा भाऊ आपल्या शेतीत रमले.
इवलेशे रोप लवियेल्या दारी । त्याचा वेणू गेला गगनापरी या उक्तीप्रमाणे हळू हळू दामोदर मोठा भाऊंचा संसार हा सुखाचा समाधानाचा झाला. पुढे शेती वाढत गेली . संसारात भरभराटीचे दिवस पाहायला येऊ लागले. 10 एकर शेती 11 सदस्याच्या एकत्र गुण्यागोविंदाने आज नांदत आहे. मोठा भाऊ व इतर भाऊ 15 दिवस शेतीत मुक्कामाला राहून राबराब राबतात. या कुटुंबात हेवेदावे भांडण तंटा याला थारा नाही. मोठा भाऊंच्या कुटुंबाची माहिती घेतांना संसाराच्या वाटेवर झालेल्या संघर्षाची कथा सांगतांना दामोदर मोठा भाऊंचे डोळे भरून येतात.
आज मोठा भाऊंच्या कष्टकरी खूप चांगले दिवस उजळले आहेत.आज ही एकतेचा संदेश देणाऱ्या या कुटुंबात 11 लोकांचा गोतावळा ,13 गाई , 2 विहिरी,1टुवेल (बोअर) 10 एकर शेती अशा प्रकारे प्रगतीचा आलेख वाढत चाललेला दिसून येतो. दामोदर मोठा भाऊंनी दुग्धव्यवसायात एवढी प्रगती केली की,स्वर्गीय वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठांन या संस्थेने धुळे जिल्ह्यातून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय पुरस्करसाठी दामोदर मोठा भाऊंची निवड केली. या पुरस्काराचे स्वरूप श्रीफळ शाल, स्मृतिचिन्ह आणि 21 हजार रुपये रोख अशा स्वरूपाचा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला.या एवढ्या मोठ्या पुरस्काराचे श्रेय मोठा भाऊ म्हणतात की , माझ्या एकट्याचे नसून माझ्या पूर्ण परिवाराचे आहे .
आज ही मोठा भाऊ गावातील आणि परिसरातील शेतकऱ्यांना मोकळ्या मनाने मार्गदर्शन करत असतात.अशा एका आदर्शवत शेतकऱ्याची यशोगाथा कृषि महाविद्यालय पुणे येथील कृषिदूत निखिल खैरनार यांनी जाणून घेतली असून यांचा कृषिदूत नक्कीच भावी जीवनात आदर्श ठेवतील यात तीळ मात्र शंका नाही.
तसेच ही यशोगाथा जाणून घेण्यासाठी विषय तज्ञ डॉ एच पी सोनवणे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ आर ए कारंडे,डॉ एम व्ही अजोतीकर,डॉ सावळे यांचे मार्गदर्शन लाभले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा