Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

शिरपूर येथील खंडेराव मंदिराजवळ अरुणावती पूल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच मनविसे अंगीकृत संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले




शिरपूर प्रतिनिधी:दिनांक १८/०९/२०२० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना च्या वतीने शिरपूर येथील रामसिंग नगर अरुणावती पुलाचे, संरक्षण कठडे नसून,तसेच,पथ दिवे ही नाहीत असेच खंडेराव महाराज मंदिराजवळ खर्दे पुलाची अवस्था सारखीच आहे अश्या परिस्थितीत रात्रीच्या सुमारास काळोख अंधार असते अनेक अपघात होत असून येत्या एक वर्षात दोन बळीही गेले आहेत तरी अजून किती लोकांचा बळी घेऊन कठडे व पथदिवे चे काम पुर्णत्वास करतील ? सर्व सामान्य माणूस हा स्वतःच्या जवाबदार असेल का ? सार्वजनिक बांधकाम विभागाच अजून किती वर्षे दुर्लक्ष असेल ?असे अनेक प्रश्न अभियंता यांना विचारण्यात आले.

व अरुणावती पूल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच मनविसे अंगीकृत संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले तसेच मुख्य अभियंता यांनी स्वतः आश्वासन दिले व लवकरात लवकर प्रस्तावा आम्ही टाकतो व पथदिवेचे काम करु असे ग्वाही दिली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून येत्या १५ दिवसांत जर काम पूर्ण नाही झाले तर खळखट्याक नविन्यपूर्ण आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे तर्फे देण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष राकेश चौधरी ,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे,मनविसे शिरपुर ता.संघटक कैलास बाबर,मनविसे शिरपूर शहर अध्यक्ष सोनु राजपुत,मनसे शिरपूर शहर उपाध्यक्ष घनश्याम मराठे,मनसे ता.उपाध्यक्ष विलास परदेशी,मनसे शहर उपाध्यक्ष आबीद कुरेशी,मनविसे ता.उपाध्यक्ष भटु पाटील,मनसे शहर सचिव मुकेश माळी,सोपान पाटील, किरण माळी व अदी.उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध