Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात, सोयाबीनचा पीक विमा मंजूर !!!




उस्मानाबाद (राहुल शिंदे)दि.30 शेतकरी बांधवांनसाठी दिलासदायक बातमी
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यामध्ये ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या सोयाबीन पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते.शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता.विमा कंपनीने नुकसाननीची प्रत्यक्ष पाहणी केली होती.

खा.ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी,ग्रामसेवक यांच्या समवेत पाहणी केली होती.

याच अनुषंगाने आज मुंबई येथील क्षेत्रीय अधिकारी दिलिप लांगे यांची खा.ओमराजे निंबाळकर, आ.कैलास घाडगे-पाटील यांनी भेट घेतली होती.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा पिक विमा मंजूर झाला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील 392653 शेतकऱ्यांना सोयाबीनचा 4586392209 रु, निलंगा व औसा तालुक्यातील 122453 शेतकऱ्यांना 1775538337 रु व बार्शी तालुक्यातील 75204 शेतकऱ्यांना 628250389 रु विमा मंजूर असून लवकरच पैसे खात्यावर जमा होणार आहेत.

अशी माहिती उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खा.ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध