Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
भोई मच्छिमार समाजाने आपल्या समस्या सोडविण्यासाठी एकतेतुन पुढे यावे..!श्री प्रकाश लोणारे...!
भोई मच्छिमार समाजाने आपल्या समस्या सोडविण्यासाठी एकतेतुन पुढे यावे..!श्री प्रकाश लोणारे...!
धुळे प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्यातील मच्छिमार समाज घटकाचे मच्छिमार संस्थापातळीवर अनेक प्रश्न प्रलंबित असुन त्यावर नियोजनबध्द आणि अभ्यासपुर्ण रित्या कार्य होने अतिआवश्यक आहे असे प्रतिपादन विदर्भ मच्छिमार संघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्यातील भारतीय जनता पार्टीचे निमंत्रित सदस्य प्रकाश लोणारे यांनी धुळे भेटी दरम्यान सांगितले.
धुळे येथील समाज सेवक तथा मा नगरसेवक गणेश बापु मोरे-भोई यांच्या कार्यालयात या भेटी अंती मच्छिमारांच्या संस्थापातळीवरील विविध समस्यांच्या मुद्दयावर ही चर्चा करण्यात आली तसेच राज्यातील सामाजिक, राजकीय विषयाच्या बाबीवरही चर्चा करण्यात आली यावेळी समाजसेवक तसेच मा नगरसेवक गणेशजी मोरे-भोई, जेष्ठ समाजसेवक तावडेसर, समाजसेवक तसेच बांधकाम व्यावसायिक रोहितशिंगाणे सर,दोंडाईचा येथील समाजसेवक किरण वाडीले, समाजसेविका तसेच गायिका, कवयित्री सौ अल्काताई घाटे, तामसवाडी, तालुका पारोळा येथील भोई मच्छिमार सोसायटीचे समाज बांधव धनराज चिंधा भोई (सेवानिवृत्त PI) समाजसेवक विश्वासजी मंगा भोई (सेवानिवृत्त ASI) समाजसेवक बाबुलालजी पिरण भोई, समाजसेवक अशोकजी आखडू भोई, समाजसेवक दत्तू पंडित भोई, समाजसेवक विनोद अखाडू भोई, समाजसेवक अनिलजी घाटे, समाजसेवक धनराजजी संपत भिल ही समाज मंडळी उपस्थित होती.
यावेळी वैद्यकीय विभाग आणि सरकारी पातळीवरील विभागांच्या नियमांच्या दिशा निर्देशांची योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती शेवटी प्रकाश लोणारे यांचा धुळे जिल्हा भोई समाजाच्या वतीने यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा