Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०
रावेर तालुक्यातील रोझोदा येथे वयोवृद्ध जोडप्याचा खून...!
वयोवृद्ध दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात, कोरोना चाचणीसाठी घरी गेलेल्या अधिकाऱ्यांसमोर थरारक दृश्य..!
जळगाव : रावेर तालुक्यातील रोझोदा येथे
वयोवृद्ध जोडप्याचा खून
झाल्याची (Old Couple Murder In Raver) खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या उद्देशाने या जोडप्याचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस खुनाच्या कारणांचा शोध घेत आहेत (Old Couple Murder In Raver). रोझोदा येथील ओंकार पांडुरंग भारंबे (वय 90) आणि सुमनबाई ओंकार भारंबे (वय 85) हे वयोवृद्ध जोडपे राहात होते. त्यांची दोन्ही मुले मुंबईत नोकरीस आहेत.
या जोडप्याच्या शेजारी कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जोडप्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी खिरोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने सकाळी दहाच्या सुमारास आले.
त्यांनी दाम्पत्याचे दार ठोठावले असता आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.
पथकाने दार उघडताच समोर ओंकार भारंबे त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तेव्हा हा प्रकार उघडकीला आला. तर सुमन भारंबे यांचा मृतदेह स्वयंपाक घराच्या गॅसच्या ओट्याजवळ आढळून आला. सुमन भारंबे यांच्या अंगावर दागिने आढळून आले नाहीत.
यामुळे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्यांनी हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे (Old Couple Murder In Raver).
घटनेचे वृत्त कळताच जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या वृद्ध जोडप्याचा तिक्ष्ण हत्याराने खून केल्याचे आढळून आले. खुनाचे नेमके कारण काय असावे याचा शोध घेतला जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा