Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
मा सुरेश दादूराम मल्लाव...!भोई, एक सेवाभावी नेतृत्व आपल्या पोलिससेवेतून निवृत्त...!
मा सुरेश दादूराम मल्लाव...!भोई, एक सेवाभावी नेतृत्व आपल्या पोलिससेवेतून निवृत्त...!
मुंबई/पुणे:मल्लाव-भोई समाजाची शान व मान ज्यांच्या कार्यामुळे उंचावली असे महाराष्ट्र पोलीस खात्याचे मुंबई विभागातील पोलीस निरीक्षक श्री सुरेशराव दादूराम मल्लाव-भोईसाहेब हे दिनांक ३०.९.२०२० रोजी त्यांच्या सेवेच्या नियत नियमानुसारच्या पोलिस अधिकारी सेवेतून निवृत्त झाले.
नेहमी आपली जबाबदारी बजावत असताना आपल्या समाजात पोलीस चौकी बद्दल जर काही समस्या भेडसावल्या तर ते नेहमी अग्रभागी असत व समाजाला कायद्याचे महत्त्व सांगत असत वेळ प्रसंगी कायद्याचा आधार घेऊन यातून बाहेर काढत असत असे अनेक प्रसंग समोर आहेत.
पुणे जिल्ह्यातील समाजातील जेष्ठ समाज सेवक कै दादासाहेब मल्लाव, मनिष काची, कै ताराचंद परदेशी, मंगेश ढेरे, देवेद्र परदेशी या व अशा अनेक समाज सेवकांना त्यांनी समाजातील एक समाजघटक म्हणून मदतीचा मोठा हातभार दिला आहे तसेच अनेकदा अनेक बाबीवर मार्गर्शनही केले आहे. त्यांची साधी राहणी,उच्च विचार आणि समाजघटक यांच्या समस्येला धाऊन येण्याची वृत्ती खरोखर फार मोठी होती आणि आजही ती आहे.
मा सुरेश दादूराम मल्लाव-भोईसाहेब पोलीस निरक्षक पीआय ठाणेशहर होण्या अगोदरचा त्यांचा प्रवास पाहु या १४/०९/१९६२ ला जन्म, जन्मठिकाण शिरूर काचीआळी, २५/०५/१९८४ ला लग्न झाले, १/०६/१९८१ ला पोलीसभर्ती झाले, प्रथम पोस्टिंट बॉम्बे सेंट्रलला झाली, १९८१ ते १९८५, दूसरी पोस्टिंग घाटकोपर मुख्यालय १९८५ ते २००१, सन २००२ मधे पीएसआय म्हणुन निवड, २००२ ते २००७ तुर्भे पोलिस ठाणे, २००७ ते २०११ एसपी युनिट ब्रांच, २०११ ते २०१४ नेरुल पोलीस ठाणे नविमुंबई, २०१४ ते २०१५ नाशिक इंद्रानगर पोलिस ठाणे, २०१५-२०१७ पोलीस महासंचालक कार्यालय, २०१७ ते २०२० टिळक नगर पोलिस ठाणे शहर, पूर्ण सर्विस मध्ये १५८ अवार्ड मिळाले एक ही शिक्षा नाही, तुर्भे पोलिस ठाणेस दरोडे, खून या सारखे गुन्हयातील आरोपींना जेल बंद करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळेल असा तापस केला.
नेरुळ पोलिस ठाणे गुन्ह्याची सोडवणुक उत्तम कामगिरी, टिळकनगर ठाणे येथे चोराना पकडून अनेक गुन्हे ओपन केल्यामुळे त्यांना अवार्ड मिळाले. २००२ पीएसआय झाले, २०११ ला एपीआय झाले, २०१६ पीआय झाले एकूण ३९ वर्ष ३ महिने २८ दिवस सर्विस केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा