Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
एक हात मदतिचा अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पुर्णा येथील भोई समाजाचे रहीवाशी दिपक कावनपुरे यांचा विज पडुन झालेली अत्यंत दुखत घटना...!
एक हात मदतिचा अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पुर्णा येथील भोई समाजाचे रहीवाशी दिपक कावनपुरे यांचा विज पडुन झालेली अत्यंत दुखत घटना...!
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील सावंगा बु यागावातील रहीवाशी आपल्या भोई समाजाचे मच्छीमारी व्यवसाय करित असतानी अचानक नाव पलटी होवुन दिलीप बावने त्यांचा दुदैवी मृत्यु झाला दोन्ही परिवारवार आलेलं नैसर्गिक संकट आपत्ती याला सावरण्यासाठी एक हात मदतिचा या माध्यमातून महाराष्ट्रतील आमच्या भोई समाजाने जी मदत आर्थिक देणगी देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेवुन कावनपुरे आणि बावने परिवाराला सावरण्याचे काम आपल्या भोई समाजाने करुन दाखविले. मदत देणार सर्व भोई समाज बांधवाचे मनपुर्वक अभिनंदन आपन जो एक हात मदतिचा या गृपवर विश्वास दाखविला त्याबद्दल गृपच्या वतीने पुन्हा पुन्हा आपल अभिनंदन.
या दोन्ही घटनेचे ज्यांनी पुढाकार घेतला असे श्री संतोष श्रीनाथ साहेब,अमरावती उमेशभाऊ। सोनोने नेर जिल्हा यवतमाळ यांनी आपले गुगल पे फोन उपलब्ध करुन दिले.
भोई समाजाचा विश्वास जिंकण्याच काम प्रामाणिक पणाने व एक हात मदतिचा या गृपच्या माध्यमातून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली.
संतोष भाऊ श्रीनाथ यांच्या गुगल पे व फोन पेच्या माध्यमातून एकुण रक्कम रु 17330₹ जमा झाली.तसेच उमेशभाऊ सोनोने यांच्या माध्यमातून एकुण रक्कम 8400₹ जमा झाली. तसेच श्री प्रविणभाऊ धारपवार यांनी खुप मोठी जबाबदारी घेवुन यानी सुद्धा त्यांच्या संपूर्ण टिमने 5500 रुपये दिले. तसेच भोई समाज महाराष्ट्र फांउंडेशन अकोला टिमच्या माध्यमातून उमेशभाऊ नंदाने यांनी सुद्धा रु 3000 आर्थिक मदत दिली.एकुण रक्कम 34230 जमा झाली.
परिस्थिती अती हलाखीची असल्यामुळे सर्व उपस्थित समाजसेवकांनी ५७७०₹गोळा करून दोन्ही कुटुंबाना प्रत्येकी दिपक कावनपुरे याना 20,000 हजार रुपये देण्यात आले. तसेच दिलीप बावने कुटुंबाना सुद्धा 20000 रु देण्यात आले.
भोई समाजाचे तडफदार नेतृत्व आत्मारामजी मात्रे यांच्या संपूर्ण टिमच्या वतिने हि रक्कम दि 27/9/2020 रोजी त्यांच्या घरी जावुन चेक च्या स्वरुपात देण्यात आली दोन्ही कुटुंबाच सात्वन चर्चा करून हिमत देण्याच काम भोई समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रमाणीकपणे आपली जबाबदारी आपला भोई या नात्याने पार पाडली.एक हात मदतिचा
भोई समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी वेळातला वेळ काडुन दोन्ही आसेगाव पुर्णा सावंगा गावला भेट दिली.
या मदत प्रसंगी आत्मारामजी मात्रे,संतोषजी श्रीनाथ,उमेशभाऊ नंदाने,डॉ विकास सोनोने,निलकंठ सुरजूसे, विशाल लोणार,गजानन ढोके साहेब, सुरेशजी गावंडे साहेब,अजुर्नजी नेमाडे साहेब, भास्करराव नंदाने साहेब,दादाराव माहोरे,उमेशभाऊ सोनोने, पुंडलिकराव बावने,प्रविनभाऊ धारपवार विनोद बावने, मंगेशभाऊ हरसुले,उमेशभाऊ हरसुले,दिलीप श्रीनाथ, योगेश तायडे,संदीप चवरे, रोशन श्रीनाथ,मंगेश सोनोने, निलेश सोनोने, भगवान सुरजुसे, संतोष सुरजुसे, संजय भारसाकळे या सर्व समाजसेवक आणि गावकऱ्यांच्या उपस्थित चेक देण्यात आला.
आपल्या सर्व भोई समाजाने जो विश्वास दाखविला त्याबद्दल पुन्हा आपल अभिनंदन.
एक हात मदतिचा या गृपवर जो विश्वास दाखविला व संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून योगदान दिल्याबदल सर्वांचं अभिनंदन. सर्वांच्या पुढाकाराने सर्वाच्या सहकार्याने सर्व काही शक्य आहे हे आपन सर्वांनी दाखवून दिले संघर्ष करा संघटित रहा आपल्या समाजाशी आपल्या भोई समाजाच्या दुःखात,सुखात सहभागी व्हा.
एक हात मदतिचा आपल्या समाजाच्या मदतीसाठी आपली सर्वांची लढाई.
चलो एकता की और
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा