Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०
नोकरी इच्छूक उमेदवारांनी आपला आधार क्रमांक...! प्रोफाईल तात्काळ अपडेट करावी...!
उस्मानाबाद,(राहूल शिंदे) दि.21:-महाराष्ट्र शासन,कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने नोकरी इच्छुक उमेदवारासाठी एम्पलॉयमेंट नोंदणी कार्ड www.mahaswayam.in हे वेबपोर्टल विकसीत करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व नोकरी इच्छुक उमेदवार कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे उमेदवार तसेच या वेबपोर्टलवर नोंदणी केलेले सर्व उमेदवार ज्यांनी अद्याप पर्यंत आपले आधार कार्ड एम्पलॉमेंट कार्डशी लिंक केलेले नाही. त्यांनी वेबसाईटवर आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट करुन घ्यावी.
यापुर्वीची आधार लिंक करण्याची तारीख 31ऑगस्ट 2020 पर्यंत होती. त्यास मुदतवाढ देवुन ही मुदत 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
संबंधित उमेदवारानी आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट (अद्यावत) न केल्यास आपली नोंदणी 30 सप्टेंबर 2020 अखेर रद्द होईल, असे सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उस्मानाबाद यांनी असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा