Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

ऐनपूर महाविद्यालयाचे प्रा.संदीप साळुंके यांना पी.एच.डी. पदवी मिळाल्या बद्दल सन्मान...!



प्रतिनिधी रावेर निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच ऐनपूर येथिल सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.संदीप साळुंके यांना नुकतीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर तर्फे ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयात पी.एच.डी.पदवी घोषित करण्यात आली आहे.  त्यांना नागपूर येथील वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.सुनील पुनवटकर याचे मार्गदर्शन लाभले. 

त्याच्या यशाबद्दल ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ ऐनपूर च्या वतीने संस्थचे अध्यक्ष भागवत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांच्या हस्ते त्यांचा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेतर्फे चेअरमन श्रीराम पाटील, सचिव संजय पाटील, संचालक  हरी पाटील, पी.एम.पाटील, एन.व्ही.पाटील, रामदास महाजन, जगन्नाथ पाटील, विकास महाजन, डॉ.सतिष पाटील, विजय पाटील, आर.एस.पाटील, प्रविण महाजन, सुदेश पाटील, पी.आर.चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.

फोटोत सन्मान करतांना संस्थेचे अध्यक्ष व सदस्य व प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने सन्मान स्वीकारतांना प्रा.संदिप साळूंके.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध