Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

शेगावात धनगर आरक्षणाची मशाल पेटली आंदोलन तीव्र करण्याचा इशारा...!



शेगाव (प्रतिनिधी उमेश राजगुरे) अनेक वर्षांपासून प्रत्येक पक्षाने सत्तेवर येण्यासाठी धनगरांची मते आरक्षणाच्या नावावर मिळवली मात्र सत्ता मिळताच आरक्षण विसरले म्हणून सरकारला जागे करण्यासाठी आज २५ सप्टेंबर रोजी धनगर समाजाने सरकार विरोधात निषेध नोंदवला. 
     
धनगर समाज मेंढपाळ असून राना-वनात भटकणारा समाज आहे. राज्यात मेंढपाळांवर दिवसेंदिवस हल्ले होत असताना राज्य सरकार मात्र कुठलीच भूमिका घेण्यास तयार नाही त्यामुळे तात्काळ मेंढपाळांना संरक्षण देऊन त्यांच्यावर हल्ला करणार्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा, तसेच भाजप सरकारने धनगर समाजासाठी एक हजार कोटीचे बजेट जाहीर केले होते त्याची अंमलबजावणी महाविकास आघाडी सरकारने करावी यासह इतरही मागण्या निवेदनात नमूद असून यावर गोपाल मोहें, अमर बोरसे, चंद्रकांत माने, सागर घुले, शिवम कळंबे, श्रावण पुंडे, निलेश घोंगे, गणेश वसत्कार, प्रवीण विरघट, गोपाल उज्जेनकार, संतोष वानखडे, देवचंद समदूर, पुंडलिक बोळे, सचिन जाधव यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध