Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०
महाराष्ट्र पोलीस दलास कलंक असणाऱ्या पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यास अटक करा...!
भूम (राहुल शिंदे)दि.7 स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात मदत करण्याची बतावणी करून सांगली जिल्ह्यातील कडेगांव पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांनी वारंवार बलात्कार केल्याची तक्रार २८ वर्षीय पीडित तरुणीने शुक्रवारी २८ ऑगस्ट रोजी कडेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यानुसार विपीन हसबनीस याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मात्र आठ दिवस होऊनही आरोपीला अटक करण्यात आली नाही.
राज्यात माहिला व मुलींवर बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याप्रकरणी राज्य सरकारने कडक पावले उचलून उच्चस्तरीय चौकशी समिती नेमुन बलात्कार पिडीत तरुणीला न्याय मिळवून देण्याची मागणी विश्व मराठा संघ धाराशिवच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे दिं 7 सप्टेंबर रोजी भुम तहसीलदार यांच्या मार्फत निवेदना द्वारे करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख सोमनाथ कोकाटे युवकजिल्हाध्यक्ष अजित तांबे पाटील युवकजिल्हाकार्याध्यक्ष उमेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा